पुण्यातील कोंढवा भागातील मौलाना अब्दुल कलाम आझाद शाळे (क्र २०९) मध्ये पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक शिक्षणाची सोय आहे. शाळेची पटसंख्या तब्बल अकराशे आहे. इथे एका वर्गामध्ये 80 ते 90 पटसंख्या आहे. असे असतानाही महानगरपालिका मात्र या मुलांना जमिनीवर बसायला लावते आहे.


या शाळेमध्ये पहिली व दुसरीचे प्रत्येकी दोन वर्ग आहेत. तसेच बालवाडीचे सुद्धा एकूण चार वर्ग आहेत. त्याची पटसंख्या सुद्धा उत्तम आहे. पहिलीच्या वर्गात तर 90 च्या जवळपास पटसंख्या आहे.

महानगरपालिकेच्या शाळांमध्ये मुलांचा ओढा कमी असतो परंतु या शाळेमध्ये मुलांची संख्या चांगली असतानाही सुविधा मात्र अपुऱ्या आहेत. बालवाडी पत्र्याच्या शेड मध्ये चालते. सध्या थंडीचे दिवस आहेत आणि अशा वेळेस नर्सरीची मुले जमिनीवर बसून खेळतात व अभ्यास करतात. तिथल्या सतरंज्या अपुऱ्या पडत आहेत तर पहिली दुसरीच्या वर्गांना बेंचेस नाहीत. त्यामुळे त्या मुलांनाही वर्गामध्ये जमिनीवर बसायला लागते आहे.

या संदर्भात आम आदमी पार्टीने आयुक्तांकडे यासंदर्भात मागणी पत्र दिलेले आहे. परंतु अजूनही त्याबाबत कार्यवाही झालेली नाही. मुलांची संख्या चांगली असतानाही त्यांना सुविधा न देणे हे गंभीर आहे याबाबत तातडीने त्यांना बेंचेस उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी आम आदमी पार्टीचे एम अली सय्यद यांनी केली आहे.


शिक्षण मंत्री केसरकर यांनी सुद्धा अधिवेशनात मध्ये आपण बालवाड्या या प्राथमिक शाळांना जोडून घेणार असल्याचे सांगितले. परंतु मुळात जोडून असलेल्या शाळांमध्ये ही व्यवस्था देण्यामध्ये हे सरकार अपुरे पडत आहे. प्रशासन मोठी मोठी टेंडर काढण्यात व्यस्त आहे परंतु एवढ्या किरकोळ सुविधा का देऊ शकत नाहीत असा प्रश्न आप चे मुकुंद किर्दत यांनी केला आहे.

Please follow and like us:
Pin Share

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »