नगरसेविका लताताई धायरकर आणि त्यांचे चिरंजीव किशोर भाऊ धायरकर तसेच किशोर भाऊ धायरकर युवा मंच आणि अभिजीत आर्ट्स यांच्या संयुक्त उपक्रम.
पुणे: कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाला वेठीस धरले आहे. यातूनच सणसमारंभ देखील सुटले नाहीत. यात पुण्याची शान असलेला गणेश उत्सव अगदीच काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. पुणेकरांच्या लाडक्या गणेशोत्सवाच्या आनंदावर विरजण पडू नये, यासाठी पुण्यातील कोरेगाव, घोरपडी आणि मुंढवा भागातील नगरसेविका लताताई धायरकर आणि त्यांचे चिरंजीव किशोर भाऊ धायरकर यांना कल्पना सुचली. किशोर भाऊ धायरकर युवा मंच आणि अभिजीत आर्ट्स यांच्या वतीने बाप्पा आपल्या घरी हा उपक्रम सुरू करण्यात आला.

कोरोना संसर्गाच्या काळात देखील लोकांना श्रीची सुबक शाडू मातीची मुर्ती उपलब्ध व्हावी, या हेतून किशोर भाऊ धायरकर युवा मंच आणि अभिजित आर्टस् यांच्या वतीने अनोखा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमा अंतर्गत एका टेम्पो ट्रॅव्हलर बस मधुन श्रीच्या अतिशय आकर्षक मुर्त्या गणेश भक्तांना खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ट्रॅव्हलर बस कोरेगाव पार्क, मुंढवा, घोरपडी परिसरातील प्रत्येक सोसायटी आणि कॉलोनीतील जाणार असून सोसायटीतील गणेश भक्तांना ट्रॅव्हलर बस मधिल मुर्त्या आपल्या ऑर्डर प्रमाणे बुक करता येणार आहे.



एकदा मूर्ती बुक केल्या नंतर गणेश उत्सवाच्या पूर्वी दोन दिवसा आधी श्रीची मुर्ती घरपोच आणून दिली जाणार आहे. कोरोना वायरस संसर्ग काळात नागरिकांनी गणपती मूर्ती विक्री स्टॉल वर जास्त गर्दी करू नये त्यासाठी किशोर भाऊ धायरकर युवा मंच आणि अभिजित आर्टस् यांच्या तर्फे हा उपक्रम सुरू केला आहे. याचा फायदा नागरिकांनी करून घ्यावा, जेणेकरून या संसर्गाच्या काळात उत्सव साजरा करताना नागरिक देखील सुरक्षित राहू शकतील.

विसर्जन पद्धतही इको फ्रेंडली
कोरोनाच्या संसर्गाला आळा बसावा यासाठी एक कल्पना सुचली आणि या कल्पनेतूनच बाप्पा आपल्या घरी हा उपक्रम सुरू केला. बाजारात न जाता नागरिकांना घरी बसूनच बाप्पाची मूर्ती विकत घेता येणार आहे. यामुळे व्यक्ती सुरक्षित राहील आणि घरातील गणेश उत्सवही. तसेच शाळु मातीची इको फ्रेंडली गणेशाची मूर्ती विसर्जित करण्याची पद्धत देखील इको-फ्रेंडलीआहे .त्यामध्ये मूर्तीचे विसर्जन घरातील एखाद्या भांड्यात किंवा कुंडीत देखील केल्या जाऊ शकते
किशोर भाऊ धायरकर, अध्यक्ष (किशोर भाऊ धायरकर युवा मंच)
या बातमीच्या व्हिडीओ लिंकसाठी येथे क्लिक करा