मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे चिंचवड विधानसभा कार्याध्यक्ष, वृक्षमित्र अरुण पवार यांचा वाढदिवस मोफत आयुष्यमान भारत योजनेचे उद्घाटन, सुकन्या योजनेच्या माध्यमातून ५२ मुलींचे खाते काढून रक्कम जमा, ५२ प्रकारच्या ११ हजार वृक्षांचे वाटपाचे सुरुवात, तसेच सांगवी, पिंपळे गुरवमध्ये विविध ठिकाणी वृक्षारोपण करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 


मोफत आयुष्यमान भारत योजने अंतर्गत सुमारे ७५० नागरिकांनी लाभ घेतला. ही योजना २० ऑगस्ट पर्यंत सुरु असून जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा. तसेच वाढदिवसाचे औचित्य साधून लुंबिनी बुद्ध विहार येथे, तसेच भंडारा डोंगर येथे वृक्षारोपण करण्यात आले. ५२ प्रकारच्या ११ हजार वृक्षांच्या वाटपालाही सुरुवात करण्यात आली. सुकन्या योजनेच्या माध्यमातून ५२ मुलींचे बँकेत खाते उघडून प्रत्येकी अडीचशे रुपयांचा धनादेश जमा करण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अतुल शितोळे, प्रशांत शितोळे, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, शिवाजी पाडुळे,

ह.भ.प.तुकाराम महाराज, ह.भ.प. बब्रुवान वाघ महाराज, ह . भ. प . भागवताचार्य शास्त्री महाराज ह.भ.प. राष्ट्रीय शिव कीर्तनकार गजानन वाव्हळ महाराज, डी.वाय.एस.पी. राम मांडुरके साहेब, वारकरी महामंडळाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष विजयअण्णा जगताप, लातूरचे माजी आमदार शिवाजीराव कव्हेकर, लोकनियुक्त सरपंच बालाजी पवार, श्याम जगताप अभिमन्यू गाडेकर, , मराठवाडा नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन दयानंद जेवळे सूर्यकांत कुरुलकर, वामन भरगंडे, संदेश नवले, पिंटू जवळकर बळीराम माळी, नागेश जाधव, भरत शिंगोटे, युवराज नलावडे, राजू लोखंडे महादेव बनसोडे, हरिभाऊ पाटील, बाळासाहेब धावणे,

संतोष मोरे, राहुल चोथवे, शिवलाल कांबळे विकास आघाव, अमोल नागरगोजे, कैलास सानप हनुमंत घुगे, ज्ञाना फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पोपट बडे, प्रा. संपत गर्जे, स्वीकृत नगरसेवक गोपाळ माळेकर, सामाजिक कार्यकर्ते माधव मनोरे, दीपक जाधव, सुभाष  दराडे, सोमनाथ नवले, राजाभाऊ मिसाळ, बाळासाहेब साळुंखे,

प्रकाश इंगोले, नंदू काटे, समाज प्रबोधनकार शारदाताई मुंडे, आण्णा सानप, शिवकुमार बायस, नितीन चिलवंत, अमोल लोंढे, सोमनाथ शेटे, आण्णा जोगदंड, धनाजी येळकर पाटील, अंगद जाधव,

गणेश ढाकणे, सखाराम वालकोळी, पुनाजी रोकडे सुदाम मराठे, विष्णु शेळके, लुंबिनी बुद्ध विहारचे अध्यक्ष मोहन कांबळे, नाना धेंडे, अनंत भालेराव, श्याम घोडके, बाळासाहेब पिलेवार, बुद्धभूषण विहारचे सदस्य, रिक्षा ऑटो संघटना, संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक संघ, भीष्माचार्य जेष्ठ नागरिक संघ, भैरवनाथ ज्येष्ठ नागरिक संघ या संघांचे सदस्य, संचालक मंडळ, सुदर्शन नगर पिंपळे गुरव या भागातील युवक वर्ग, पुण्यश्लोक अहिल्यादेवी जनसेवा फाउंडेशन देहूगावचे पदाधिकारी, आदी मान्यवर उपस्थित होते.


ह ,भ ,प ,संत महंत गुरुवर्य तसेच  राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे, या मान्यवरांनी अरुण पवार यांच्या कार्याचा गौरव करीत वृक्षारोपण, सामाजिक क्षेत्रातील कामाची प्रशंसा केली. नुकताच राज्य शासनाचा शिवाजी महाराज वनश्री राज्यस्तरीय वृक्षमित्र पुरस्कार मिळाला आहे, ही याची पोचपावती असल्याचे गौरवोद्गार काढले. 

Please follow and like us:
Pin Share

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »