जेठेज क्लासेसच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ
पुणे: शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांचा गुणवत्तापूर्ण विकास घडविण्यासाठी जेठेज क्लासेस सारख्या शिक्षण अकॅडमी समाजात महत्वपूर्ण भूमिका बजावतात अशी भावना आमदार भीमराव तापकीर यांनी व्यक्त केली.
रविवार २३ जुलै रोजी सायंकाळी जेठेज क्लासेसच्या वतीने आयोजित धनकवडी येथील जैन मंदिर हॉल मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभात ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर खडकवासला विधानसभेचे आमदार भीमराव तापकीर ,भारती विद्यापीठ जेष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष शंकरराव पाटील, उपाध्यक्ष तानाजी शिंदे, माजी सैनिक तथा जेठेज अकॅडमी संचालक दिलीप सुर्यवंशी, प्राध्यापक अशोक पाटील, संतोष घाडगे, जेठेज क्लासेसचे संचालक आनंद जेठे, प्राध्यापिका दिपाली जेठे आदी मान्यवर उपस्थित होते.
तापकीर म्हणाले;”उच्चशिक्षित आनंद जेठे यांनी आपल्या शिक्षणाचा गरीब, होतकरू तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उपयोग व्हावा या विचारातून एक दशकांपूर्वी सुरू केलेला छोट्याशा दहा बाय दहाच्या खोलीतून प्रवास आज हजारो विद्यार्थ्यांना समृद्ध करत आहे.
त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना राज्यपालांनी सन्मानित केले ही त्यांच्या कार्याची मिळालेली पोहचपावती आहे.
वाढत्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांच्या क्षमतांचा सर्वांगीण विकास घडवत शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी जेठेज सारख्या क्लासेसची नितांत गरज आहे.
जेठेज क्लासेसचे संचालक आनंद जेठे म्हणाले;”महाराष्ट्राच्या विविध ग्रामीण भागातील विद्यार्थी जेठेज क्लासेस मध्ये शिक्षण घेतात.
परिस्थितीशी संघर्ष करणारा विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी आम्ही विद्यार्थी दत्तक योजना सुरू केली आहे.
जात धर्म पंथ हे न पाहता आर्थिक निकषांवर सामाजिक दायित्व भावनेतून शिक्षणाची जिद्द असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देणार आहोत.
“आयआयटी’ – “जेईई’ , “नीट’,”सीईटी’, परीक्षांसाठी सरळ साधा आणि विद्यार्थ्यांना समजेल अशा सोप्या भाषेत शिकवण्याच्या शैलीने अनेक विद्यार्थी यशस्वी झाले आहेत:”याचा मनाला निश्चितच आनंद आहे.
पुस्तकी ज्ञानासोबत विद्यार्थ्यांच्या मनात नैतिक विचारांची रुजवन करत विद्यार्थ्यांना अधिक सक्षम करणे हेच आमचे ध्येय आहे.अशी भावना जेठे यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मण जाधव यांनी केले