पालकमंत्री चंद्रकांत पाटील श्री साई मंदिरास दिली भेट
पुणे : २ जून पासून गुरुपौर्णिमा उत्सव साई मंदिर आळंदी रोड येथे सुरू आहे आज गुरुपौर्णिमा निम्मित भाविकांचा उत्साह शिगेला पोहचला असल्याचे दिसून आले . यावेळी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंदिरास भेट देऊब भाविकांना शुभेच्छा दिल्या .
१९९८ रोजी श्री साई सेवा प्रतिष्ठान , च्या वतीने श्री साईबाबा देवस्थानची स्थापना वडमुखवाडी ,आळंदी रोड पुणे येथे करण्यात आली .अल्पावधीच लाखो साईभक्तांचे श्रधास्थान म्हणून हे साई देवस्थान प्रसिद्ध झाले . २५ वर्ष पुर्ण झाल्याने रौपहमहोत्सवी वर्ष आहे .दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सोमवार ३ जुलै २०२३ रोजी गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला या उत्सवासाठी व साई दर्शनासाठी पुणे शहर , पिंपरी चिंचवड व आळंदी परिसरातील भाविक अतिशय उत्साहाने सहभागी झाले होते .
श्री साई देवस्थान वडमुखवाडी येथे गुरूपौर्णिमा उत्स्वानिमित श्रींची काकडा आरती व सनई वादन ,श्री साई सतचारित्र ग्रंथाचे पारायण व सांगता समारोह ,साईभजन ,भक्ती संगीत ,श्रीच्या पालखीची मिरवणूक ,नटराजन ग्रुप आयोजीत साईमित्र यांच्या भजन संध्या कार्यक्रमास भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते .तसेच या वेळी विशेष महापूजा व महाआरतीचे तसेच त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
सामाजिक ,राजकिय ,सांस्कृतीक ,त्याचप्रमाणे विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते .गुरुपौर्णिमा उत्सवाचा लाभ सर्व साईभक्तांनी व नागरिकांनी घेतला .सर्व भाकिक भक्तांचे स्वागत श्री साई सेवा प्रतिष्ठान समितीचे अध्यक्ष सुभाष नेलगे व विश्वस्त शिवकुमार नेलगे यांनी केले .