
पुणे : गेल्या अनेक वर्षांपासून पूजा योगेश जेधे या ह्यूमन राईटच्या माध्यमातून महिलांसाठी काम करतात त्यांनी अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचारासंदर्भात कसोशीने काम केले.

ज्यांच्या पाठीशी कोणीही उभे राहत नाही अशा अनेक मुलींना न्याय मिळवून देण्यासाठी प्रस्तापितांसोबत आणि प्रशासनासोबत नेहमीच लढा देतात. जीवाची तमा न बाळगता कायमच अल्पवयीन मुलींना न्याय मिळवून देतात. पोस्को सारखा अत्यंत गंभीर कायदा चाणक्य पद्धतीने हाताळून अनेक मुलींच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहतात. त्यांच्या कामामुळेच त्यांना सर्वत्र आपुलकी मिळाली आहे कुणावरही अत्याचार झाला तर महिला त्यांच्याकडे धाव घेतात.

अल्पवयीन मुलींसह महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी त्या सदैव प्रयत्न करतात . घर सांभाळून त्या सर्व बाबी करत असतात. या त्यांना त्यांच्या कुटुंबीयांचा देखील पाठिंबा असतो. त्यांनी केलेल्या कामामुळेच त्यांना कुटुंबियांची कायमच कौतुकाची स्थाप मिळतेच परंतु कुठल्याही परिस्थितीत ते पूजा ताईंच्या मागे खंबीरपणे उभे असतात.



अनेक प्रकरणांमध्ये त्यांना धमक्या देखील मिळाल्या आहेत परंतु त्या धमक्यांना न जुमानता त्या सदैव काम करतात . त्यांची कामाची पद्धत बघूनच राष्ट्रवादीने त्यांना पक्षांमध्ये स्थान दिले. आणि आता तर त्यांच्यावर राष्ट्रवादी पक्षाने महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी पश्चिम महाराष्ट्र रोजगार सरचिटणीस पदाची जबाबदारी सोपवली.

त्यात ज्याप्रमाणे आत्तापर्यंत महिलांना त्यांच्यावरील अत्याचार विरुद्ध न्याय मिळवून देत होत्या तशाच आता त्या महिलांना त्यांच्या पायावर उभे करून आर्थिक सक्षम करणार आहेत. की जेणेकरून तळागाळासह संपूर्ण समाजातील किंवा सर्व स्तरातील महिलांचा आर्थिक दर्जा सुधारेल आणि त्या त्यांच्या पायावर उभे राहून कुटुंबाची देखील आर्थिक कणा बनू शकतील.

यासाठीच पूजा जेथे ताई आता महिलांसाठी त्यांच्या आर्थिक सबलीकरणासाठी कसोशीने प्रयत्न करणार आहेत . पक्षाने त्यांच्यावर दाखवलेल्या या विश्वासाबद्दल त्या सदैवच राष्ट्रवादीचे जन्मदाते शरद पवार, वंदनाताई चव्हाण, सुप्रिया सुळे, अजित दादा पवार, जयंत पाटील, फौजी या खान यांचे या सर्वांचे आभार मानून सदैव त्यांच्या ऋणामध्ये राहून काम करेल असे त्यांनी बोलताना सांगितले