पुणे : राज्य सरकारने 8 मार्च महिला दिनी सरसकट सर्वच महिलांना एसटीच्या प्रवासामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 50 टक्के तिकिटामध्ये सवलत दिली . याचा फायदा असा झाला की चारच दिवसांमध्ये 48 लाख महिलांनी याचा लाभ.घेतला. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातल्या महिला देखील खुश झाल्या होत्या आणि त्यांनी तो आनंद देखील एकत्र येऊन व्यक्त करताना देखील दिसल्या .
तसे बघायला गेले तर याला एक चांगली सुरुवात म्हणता येईल. या योजनेचा नक्कीच जसा त्या महिलेच्या फायदा होईल तसाच तिच्या कुटुंबाला देखील होणार. एसटी महामंडळाला देखील या सवलतीचा फायदा होणारच आहे कारण बऱ्याच ठिकाणी महिलांसोबत तिचा नवरा तसेच तिचं कुटुंब देखील फिरायला जात.
यामुळे या योजनेने एसटी महामंडळाची बस म्हणजे आपली लाल परी ची मार्केटिंग खूप चांगल्या पद्धतीने तर होणारच. परंतु महिलांना योजनेचा फायदा देखील मिळणार आहे. परंतु काही ठिकाणी असं देखील ऐकायला मिळाले की एसटी महामंडळ जर तोट्यात आहे तर ही योजना लागू करायला नको होती.
या योजनेअंतर्गत एसटी महामंडळावर जो बोजा पडणार आहे त्याला केंद्र सरकार मदत करणार. तसेच काही ठिकाणी तर असे बघायला मिळाले की फक्त महिलांनाच 50% आरक्षण दिल्याने पुरुष मंडळी जरा दुखावल्या गेली आहे. त्यांनी देखिल एसटीच्या तिकिटामध्ये सवलततिची मागणी केली आहे. या संपूर्ण योजनेचा फायदा महिलांना कसा होतो किंवा एसटी महामंडळाला देखील कसा फायदा मिळू शकतो ह्या येणाऱ्या काही दिवसातच समजेल अशी ओरड संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होत होती परंतु अवघ्या चार दिवसांमध्येच या योजनेचा फायदा एकूण 43 लाख महिलांनी घेतला तर एसटी महामंडळाच्या तिजोरी मध्ये 35 लाखाची भर पडली.
यामुळे ही योजना लाल परीला जीवदान देणारी ठरेल की अधोगतीला नेणारी ठरेल हा येणारा काळच ठरवेल परंतु सध्या तरी या सवलतीचा फायदा संपूर्ण महाराष्ट्रात महिला मोठ्या प्रमाणावर घेताना दिसत आहे