श्रद्धा कपूर बॉलीवूड मधील प्रसिद्ध अभिनेत्रींनपैकी एक असून, तिचा चाहतावर्ग मोठा आहे यात शंका नाही. अलीकडेच, श्रद्धाचा आगामी चित्रपट ‘तू झूठी मैं मक्कार’चा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, याची चर्चा सर्वत्र रंगत असतानाच, या सिनेमाच्या प्रमोशनसाठी श्रद्धाने पुणेकरांना भेट दिली. अशातच, व्हॅलेंटाइन डेच्या खास प्रसंगी पुण्यातील एका कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना गुलाब देत श्रद्धाने हा खास दिवस सेलिब्रेट केला. असे म्हणणे योग्य ठरेल की, श्रद्धाने आपल्या चाहत्यांसोबत नेहमीच आनंद शेअर केला आहे.

या पुणे दौऱ्या दरम्यान, श्रद्धा कपूरने सेवेन वंडर्स येथेदेखील भेट दिली. तसेच, येथील प्रसिद्ध आयफेल टॉवरखाली अभिनेत्रीने वडापावचा आस्वाद घेतला. इतकेच नव्हे तर, श्रद्धाने पुण्यातील प्रसिद्ध काटाकिरर मिसळचा आनंद घेऊन आपला दौरा पूर्ण केला. अशातच, रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर अभिनीत ‘तू झूठी मैं मक्कार’या चित्रपटाच्या प्रदर्शनाची दर्शक आतुरतेने वाट पाहत आहेत.

लव फिल्म्सचे लव रंजन आणि अंकुर गर्ग निर्मित ‘तू झूठी मैं मक्कार’या चित्रपटाचे दिग्दर्शन लव रंजन यांनी केले आहे. तसेच, टी-सिरीजचे गुलशन कुमार आणि भूषण कुमारद्वारा प्रस्तुत हा चित्रपट, 8 मार्च 2023 रोजी होळीच्या दिवशी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे.

Please follow and like us:
Pin Share

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »