
पुणे : आपल्या सध्याच्या वाढीच्या योजनेचा एक भाग म्हणून बार्बेक्यू नेशन या आघाडीच्या रेस्तराँ चेन तर्फे पुण्यातील ग्रॅन्ड होराझयन, माणिक बाग, सिंहगड रोड येथे आपल्या १० व्या आऊटलेटची सुरुवात केली. ६,५०० चौरस फूटांवर पसरलेल्या या आऊटलेट मध्ये १३० पाहूण्यांची बसण्याची सोय आहे. कॉर्पोरेट लाँचेस आणि पारिवारीक भेटींसाठी हे एक योग्य स्थळ आहे. बार्बेक्यू नेशन ही भारतातील आघाडीची कॅज्युअल डायनिंग चेन असून त्यांनी प्रथमच लाईव्ह ऑन द टेबल ग्रिलिंग संकल्पना सुरु केली.

यावेळी बोलतांना बार्बेक्यू नेशन हॉस्पिटॅलिटी लिमिटेड चे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर श्री फैज आझिम यांनी सांगितले “ पुण्यातील ग्रॅन्ड होराझन, माणिक बाग, सिंहगड रोड पुणे येथे नवीन आऊटलेट सुरु करण्याची घोषणा करतांना आंम्हाला आनंद होत आहे. बार्बेक्यू नेशन मध्ये आम्ही सर्वोत्कृष्ट आदरातिथ्य आणि सेवा आमच्या ग्राहकांना देण्यासह विविध पदार्थां बरोबरच आकर्षक अंतर्गत सजावट उपलब्ध करुन देण्यासाठी कटिबध्द आहोत.”

दि इट ऑल यू कॅन बुफे पध्दती नुसार बार्बेक्यू नेशन कडून शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांची रेलचेल उपलब्ध करुन देण्यात येते. मांसाहारी स्टार्टर्स मध्ये प्रसिध्द मेक्सिकन चिली गार्लिक फिश, हॉट गार्लिक चिकन विंग्ज, तंदूरी तंगडी, काजून सीक कबाब, कोस्टल बार्बेक्यू प्रॉन्स आणि अशा अनेक पदार्थांचा समावेश असून शाकाहारी स्टार्टर्स् मध्ये तोंडाला पाणी सूटेल असे कुटी मिर्च का पनीर टिक्का, वॉक टॉस्ड सीक कबाब, शबनम के मोती मशरुम, पुरी कबाब आणि हनी सीसम सिनमॉन पायनॅपल तसेच अन्य पदार्थ उपलब्ध असतील. मांसाहारी पदार्थांच्या मेन कोर्स मध्ये चिकन दम बिर्याणी, राजस्थानी लाल मांस आणि दम का मुर्ग, तर शाकाहारी पदार्थांमध्ये पनीर बटर मसाला, मेथी मटर मलाई, दाल ए दम आणि व्हेज दम बिर्याणी यांचा समावेश आहे. लाईव्ह काऊंटर वर विविध शाकाहारी/मांसाहारी पर्याय असून यांत चिली क्रिस्पी पुरी, पालक चाट, मार्गारेटा पिझ्झा, खीमा पाव आणि चिकन शीक यांचा समावेश आहे. तर डेझर्ट मध्ये चॉकलेट ब्राऊनी, रेड वेल्व्हेट पेस्ट्रीज, अंगुरी गुलाबजामुन, केसरी फिरनी आणि असे अनेक पदार्थ आहेत. विविध प्रकारच्या कुल्फी ही या रेस्तराँ मध्ये असून त्यामुळे पाहुण्यांच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटेल. कुल्फी मध्ये अनेक विविध स्वाद जोडून अनेक आवडीच्या डेझर्टची निर्मिती करण्यात आली आहे.


बार्बेक्यू नेशन विषयी:
बार्बेक्यू नेशन ने भारतात प्रथमच डीआयवाय (डू ईट युवरसेल्फ) ची संकल्पना आणून मुंबईत २००६ मध्ये सुरु करण्यात आलेल्या पहिल्या आऊटलेट मध्ये लाईव्ह ऑन दि टेबल ग्रील ची संकल्पना सुरू केली. बार्बेक्यू नेशन ने नेहमीच सोपा असा दृष्टिकोन ठेऊन आकर्षक किंमतीत ग्राहकांना सर्वोत्कृष्ट भोजनाचा आनंद देऊ केला आहे. सेवांमध्ये सर्व प्रकारची वाढ करत ही शृंखला त्यांनी वेगाने वाढवली आहे. गेल्या १५ हून अधिक वर्षांच्या कालावधीत बार्बेक्यू नेशन ने संपूर्ण भारतातील ८० हून अधिक शहरांत १९० हून अधिक आऊटलेट्स सुरु केली आहेत. या कालावधीत ब्रॅन्ड ने नाविन्य आणत लाईव्ह काऊंटर्स, विविध कुल्फीचे प्रकार आणि अनोखी उत्पादन श्रेणी बार्बेक्यू इन अ बॉक्स सुरू केली आहे.