डॉ. राजेंद्र मिटकर यांची घोषणाः कोथरुड हॉस्पिटलचा प्रथम वर्धापन दिन साजरा

पुणे : वैद्यकीय क्षेत्रात नव नवीन प्रयोग करणारे व कोथरूड हॉस्प्टिलमध्ये शिकायला येणार्‍या परदेशी वैद्यकीय विद्यार्थ्यांना हॉस्पिटलतर्फे फेलोशिप देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्पाइन सर्जरी सेंटर व डायबिटीज सेंटर लवकरच सुरू करण्यात येणार आहे. अशी घोषणा कोथरूड हॉस्पिटलच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त हॉस्पिटलचे संचालक डॉ. राजेंद्र मिटकर यांनी केली.
हॉस्पिटलचा प्रथम वर्धापन दिन साजरा करण्यात आला. त्या प्रसंगी कोथरूड हॉस्पिटलचे संचालक डॉ राजेंद्र गुंडावार, अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. तुषार दाते, डॉ. मंजुषा प्रभूणे, डॉ. लिना दोभाडा, डॉ. दिप्ती पोफळे, डॉ. हिमांशू पोफळे आणि हॉस्पिटलचे इतर कर्मचारी उपस्थित होते.


सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून व वर्धापन दिनाचे औचित्य साधून हॉस्पिटल तर्फे सर्व नागरिकांनसाठी विनामूल्य आरोग्य शिबिर व मोफत औषधांचे वाटप केले. या शिबिरचा लाभ २०० नागरिकांनी घेतला. शिबिरात हाडांच्या आजारांवर विशेष उपचार व निदान करण्यात आले. हाडांच्या सर्व तपासण्यांसह मधुमेह, रक्तदाब, ईसीजी यांसह विविध आजारांच्या तपासण्या केल्या. डॉ. निखिल ओझा, बालरोग तज्ञ डॉ. रघुवंशी व डॉ. अर्चना मुदखेडकर यांनी तपासण्या करून योग्य उपचार व मार्गदर्शन केले.


डॉ. राजेंद्र मिटकर म्हणाले,“ कोथरूड वासियांसाठी आम्ही नवीन संकल्प केला आहे की नवजात बालांसाठी अत्याधुनिक एनआयसीयू उघडणार आहे. त्याच प्रमाणे महिलांना होणार्‍या विभिन्न आजारासंदर्भात प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ. मंजुषा प्रभूणे या वेळोवेळी मार्गदर्शन करणार आहेत. या हॉस्पिटलमध्ये आधुनिक वैद्यकीय साधणे (मशिनरी) उपलब्ध आहेत. हॉस्पिटलमधून रुग्ण आनंदी होऊनच बाहेर निघावा हा आमचा संंकल्प असून त्याच दिशेने वाटचाल सुरू आहे.”
वर्ध्यांचे खासदार रामदास तडस व आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच विलास कथुरे यांनी हॉस्पिटलला सदिच्छा भेट देऊन वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

Please follow and like us:
Pin Share

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »