चिंचवड : क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीच्या पुनरुत्थान समरसता गुरुकुलम शाळेमध्ये “वराहमिहीर अवकाश निरीक्षण केंद्राचे” उद्घाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह मा. मनमोहनजी वैद्य, पद्मश्री गिरीश प्रभुणे, हेंकल इंडिया चे सी एस आर प्रमुख हर्षवर्धन नायक, व्यवस्थापक भूपेश सिंग व डॉ. प्रसाद खंडागळे,लायन्स क्लब ऑफ पुणे सहकारनगरच्या अध्यक्षा ललिता शिंदे, आणि ग्लोबल मिशन ॲस्ट्रॉनॉमी अँड रिसर्च सेंटर चे संचालक प्रा. विशाल कुंभारे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
हेंकल इंडिया च्या वतीने गुरुकुलम विद्यालया मध्ये सुसज्ज अशा अवकाश निरीक्षण केंद्राची स्थापना करण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये खगोलशास्त्राची आवड निर्माण व्हावी आणि अवकाशासंबंधी अनेक प्रश्नांची उत्तरे त्यांना अवकाश निरीक्षण करून स्वतः शोधता यावीत, या हेतूने उच्च दर्जाचे टेलिस्कोप, बायनोक्युलर, 3डी पेंटिंग, मॉडेल्स, व्हीआर बॉक्स,पोस्टर्स,ॲस्ट्रॉनॉमी डॉक्युमेंटरी, सॉफ्टवेअर, अवकाश निरीक्षणासाठी आवश्यक सर्व साहित्य आणि अवकाशासंबंधी मार्गदर्शन करणारी अनेक प्रकारची पुस्तके या अवकाश निरीक्षण केंद्रामध्ये विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिली आहेत.
अवकाश निरीक्षण केंद्राचे नियोजन, मांडणी व संचलन ग्लोबल मिशन ॲस्ट्रॉनॉमी अँड रिसर्च सेंटर चे संचालक प्रा. विशाल कुंभारे यांनी केले, तसेच पुढील प्रशिक्षणाचे काम यांच्याच मार्गदर्शनाखाली होणार आहे
या अवकाश निरीक्षण केंद्रामधून विद्यार्थ्यांना ग्रह, तारे, सूर्यमाला, तेजोमेघ, आकाशगंगा, ग्रहणे अश्या अनेक गोष्टी शिकता येणार आहेत. तसेच येथून विद्यार्थ्यांची खगोलशास्त्रज्ञ बनण्याची पायाभरणी होईल असे डाॅ. प्रसाद खंडागळे यांनी सांगितले.
प्रा. कुंभारे यांनी अवकाश निरीक्षण केंद्राची आलेल्या मान्यवरांना सखोल माहिती दिली.
या वेळी मिलींदराव देशपांडे, मुकुंद कुलकर्णी,
माहेश्वर मराठे, रवी ननावरे, विकास माने, अॅड. सतिश गोरडे, मुख्याध्यापिका सौ. पुनम गुजर, कीर्तीकुमार काटकर, मनाली भोसले, दिपाली प्रजापती, निलिमा माने, आदी मान्यवर उपस्थित होते.
शाळेच्या वतीने सर्व पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास माने आणि , तर आभार रवी ननावरे यांनी मानले.