महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आक्रमकपणे गाजवल्यानंतर टीका -टिप्पणी व काही तुरळक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर राज्याचे विरोधी पक्षनेते आदरणीय ना.अजितदादा पवार हे पहिल्यांदाच पुणे शहरात दाखल झाल्यानंतर पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.

यावेळी पदाधिकाऱ्यांच्या घोषणा व जल्लोषाने संपूर्ण वातावरण अजितदादामय झाले होते. “एकच वादा.. अजितदादा…” ,”आम्ही कधीच राजकारण केले नाही धर्मांचे अन् जातीचे.., नेहमी हित पाहिले आहे महाराष्ट्राच्या मातीचे..” , स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो “ अश्या प्रकारच्या घोषणांनी बारामती होस्टेलचा संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता.

“गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्राच्या सत्ताधारी पक्षातील मंत्र्यांकडून महाराष्ट्रातील थोर महापुरुषांबद्दल अवमानजनक वक्तव्य करण्याची एक मालिका सुरू आहे, यावेळी पुणे शहर भाजपमधील एकाही पदाधिकाऱ्याने कुठल्याही प्रकारचे आंदोलन केले नाही किंवा साधा निषेधही व्यक्त केला नाही, परंतु छत्रपती संभाजी महाराजांबद्दल स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज अशी भूमिका मांडल्यानंतर शहरातील भाजप पदाधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने अजितदादांच्या विरोधात आंदोलने केली यावर अजितदादांनी मी छत्रपती संभाजी महाराजांना कोणत्या एका धर्माच्या चौकटीत आणू इच्छित नाही , स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज हे शेवटच्या श्वासापर्यंत स्वराज्याच्या रक्षणासाठी लढत राहिले, सर्व जातीधर्मीय बांधवांच्या स्वराज्याच्या रक्षणासाठी लाढणाऱ्या आमच्या वीर योद्धाला “स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज” याच नावाने संबोधनार, अशी ठाम भूमिका आदरणीय अजितदादांनी घेतली. या भूमिकेचे स्वागत करत, आदरणीय अजितदादांना पाठिंबा दर्शवण्यासाठी आमचे हजारो कार्यकर्ते बारामती होस्टेल येथे अजितदादा पवार यांच्या स्वागतासाठी आलो आहोत” ,असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी व्यक्त केले.

तसेच यावेळी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने “स्वराज्यरक्षक संभाजी महाराज” या नावाच्या १०००० स्टिकर्सचे अजितदादांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले असून, सर्व पदाधिकाऱ्यांच्या वाहनांवर, घरांच्या दरवाजांवर व दुकाने- आस्थापनांवर अशा प्रकारचे स्टिकर्स लावण्यात येणार असून जास्तीत जास्त लोकांमध्ये स्वराज्यरक्षक संभाजी महाराजांच्याबाबत आपली भूमिका रुजविण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सांगण्यात आले.


प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते प्रदीप देशमुख, रवींद्र माळवदकर, वनराज आंदेकर , बाळासासाहेब बोड़के , निलेश निकम , उदय महाले , शारदा ओरसे , गफूर पठान , रुपाली पाटील , विनोद पवार , संदीप बालवडकर, महेश हंडे , दिपक कामठे, रोहन पायगुडे , गुरूमीत गिल यांसह मोठ्या संख्येत पदाधिकारी उपस्थित होते.

Please follow and like us:
Pin Share

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »