आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

पुणे : चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पार्थिवावर पिंपळे गुरव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शासनाच्यावतीने पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

यावेळी सहकार मंत्री अतुल सावे, साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील, आमदार उमा खापरे, महेश लांडगे, पिंपरी-चिंचवड शहर पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख उपस्थित होते.

यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना पालकमंत्री श्री.पाटील म्हणाले, पिंपरी चिंचवड शहर उभे करण्यात आमदार लक्ष्मण जगताप यांचे मोठे योगदान आहे. नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, महापौर, जिल्हा परिषद सदस्य, आमदार अशा विविध पदावर त्यांनी काम केले.

कर्करोग आजारपणाच्या काळात कुटुंबाने त्यांना खूप मोठा आधार दिला. आजारी असतानाही राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीच्या वेळी निष्ठा आणि पक्ष आदेश पालन करण्याचे उत्तम उदाहरण आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांनी दाखवून दिले, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Please follow and like us:
Pin Share

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »