आमदार लक्ष्मण जगताप यांनी खाजगी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

पुणे : भारतीय जनता पक्षाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे दिर्घ आजारामुळे मंगळवारी सकाळी खाजगी खाजगी रुग्णालयात निधन झालं. या बातमीने संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरावर शोककळा पसरली. गेल्या तीन वर्षापासून आमदार लक्ष्मण जगताप हे कर्करोगाशी झुंज देत होते गेल्या दोन ते तीन महिन्यापासून त्यांचे प्रकृती खालावली होती.

आजारपणामुळे आमदार लक्ष्मण जगताप हे राजकीय क्षेत्रात त कार्यरत नव्हते तरी देखील तेमहाराष्ट्राच्या राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीवेळी लक्ष्मण जगताप हे पुण्यातून रुग्णावाहिकेतून मुंबईला गेले होते.



त्यांच्या कामाचं सर्वांनी कौतुक करत त्यांना टाळ्या वाजवून आजाराशी लढण्यात बळ देण्याचं कामही इतरांनी केलं होतं

त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना कुटुंबीयांनी ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते तेथेच त्यांनी मंगळवारी अखेरचा श्वास घेतला त्यांचे पार्थिव त्यांच्या राहत्या घरी 3 ते 6 च्य दरम्यान अंत दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे तसेचसंध्या 7 वाजता अंत्यविधी पिंपरी गुरव येथे पार पडेल. काही दिवसांपूर्वी भाजपाच्या कसबा पेठ येथील आमदार मुक्ता टिळक यांचा देखील कर्करोगामुळे निधन झालं होतं.

लक्ष्मण जगताप यांची कारकीर्द
- सर्वात प्रथम लक्ष्मण जगताप हे 1992 च्या निवडणुकीत नगरसेवक म्हणून निवडून आले.
- 1997 च्या निवडणुकीतही ते निवडून आले. त्यांनी सलग दहा वर्षे पिंपळे गुरवचे प्रतिनिधित्व केले.
- 1993-94 मध्ये ते महापालिका स्थायी समितीचे सभापती होते.
- 19 डिसेंबर 2000 ते 13 मार्च 2002 पर्यंत त् ते पिंपरी चिंचवड शहराचे महापौर होते.
-2009 मध्ये त्यांनी राष्ट्रवादीला राम-राम म्हटले आणि अपक्ष म्हणून काम करायला सुरुवात केली.
-2014 मध्ये त्यांनी किसान मजदूर पक्षाकडून लोकसभेची निवडणूक लढली.
- आमदार लक्ष्मण जगताप यांनी भाजपामध्ये प्रवेश करून -2014 ची विधानसभा निवडणूक त्यांनी लढवली.
-2019 च्या आमदार निवडणुकीतही जिंकले.