फुटबॉल वर्ल्ड कप 2022 मध्ये पुण्यातील कलावंतांनी उत्कृष्ट वादनाबद्दल सन्मान

पुणे : समाजात वावरताना आरसा सोबत ठेवला पाहिजे जेणेकरून आपण कोण आहोत याची जाणीव आपल्याला होते, आणि मेहनती शिवाय काही हाताला लागणार नाही असं मत अभिनेता कमलेत सावंत यांनी व्यक्त केलं.


फुटबॉल – फिफा वर्ल्ड कप 2022 च्या निमित्ताने कतार मध्ये पुण्यातील कलावंतांनी केलेल्या उत्कृष्ट वादनाबद्दल तसेच इथोपिया, इस्राईल आणि सुदान ह्या देशात जाऊन आपली भारतीय कला संस्कृतीचे जागतिक पातळीवर दर्शन ज्या कालाकरांनी घडवून आणले अशा कलाकारांचा सन्मान ऑल आर्टीस्ट फाउंडेशन च्या वतीने दृशम २ फेम – कमलेश सावंत ह्यांच्या हस्ते करण्यात आला.

त्यानिमित्तानेच कामलेशजीं सोबत एकांकिका ते दृश्यम २ असा त्यांचा यशस्वी प्रवास जाणून घेता आला,याप्रसंगी ऑल आर्टिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश सुपेकर, संचालक उषा करंबेळकर, सोमनाथ फाटके अमीर शेख, इनर्व्हील क्लब पुणे प्लॅटिनम च्या प्रेसिडेंट स्नेहलजी चोरडिया, अनाहत पुणे च्या माधुरी जोशी तसेच निर्माते संतोष चव्हाण उपस्थित होते, या कार्यक्रमाचं अमोघ वाणीतून सूत्रसंचालन निवेदिका ऋतुजा मराठे यांनी केले.
Please follow and like us:
Pin Share

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »