कानन 2  चित्रपटाच्या चित्रीकरणाची ही घोषणा

कानन चित्रपटाचे पहिले पोस्टर आणि आणि बॅनर लॉन्च

पुणे : पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृह येथे शिवाजी फिल्म प्रोडक्शन निर्मित ‘कानन’ चित्रपटाचे पोस्टर प्रकाशन सोहळा पार पडला यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.

या सोहळ्यात  ‘कानन’- २’ चित्रीकरणाचा शुभारंभ सोहळाही पार पडला. कार्यक्रमाच्या उदघाटन अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, ज्येष्ठ सिने अभिनेते जयराज नायर यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी सैराट फेम सिने अभिनेते सुरेश विश्वकर्मा, सिने अभिनेते पांडुरंग भारती, सिने अभिनेते तसेच निर्माते दिग्दर्शक नितीन पारवे, सिने अभिनेत्री कोमल श्रीसुंदर, सिने अभिनेते हनुमंत लिंमगिरे, अखिल भारतीय मराठी चित्रपट व्यवस्थापक उमेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

दीपप्रज्वलन करून या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात  आला. मान्यवरांच्या हस्ते ‘कानन’ चित्रपटाचे पोस्टर प्रकाशन करण्यात आले. तसेच ‘कानन’- २’  चित्रीकरणाचा शुभारंभाची घोषणा करण्यात आली. यावेळी उपस्थित श्रोत्यांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली.


या चित्रपटाचे कौतुक करताना अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले म्हणाले, प्रतिकुल परिस्थती मधून चित्रपटाची निर्मिती केली आहे. अनुभव नसतानाही यशस्वी चित्रपट निर्माण करणे, त्यातून बोध घेणे ही अभिमानास्पद बाब आहे. आमची अशा नव्याने उभारी घेणाऱ्या तरुण निर्मात्यांना सदैव साथ राहील. या चित्रपटासाठी माझ्या मनापासून हार्दिक शुभेच्छा. तसेच या प्रकारची निर्मिती पुढे यावे यासाठी देखील ते प्रयत्न करणार आहेत उपस्थित मान्यवरांनी देखील त्यांचे मनोगत यावेळी व्यक्त केले.

कानन या चित्रपटाची निर्मिती संकल्पना नितीन शिवाजी पारवे सहा निर्माता सोनाली नितीन पारवे कथा के हांडे पटकथा व संवाद नितीन पारवे के हांडे निर्मिती व्यवस्था हिंमत भटू चव्हाण दिग्दर्शन गजानन पद्यने कलादिग्दर्शक व संकलन सतीश ढोणे छायांकन संकेत जाधव संगीत सुरेश घायवट गीतकार धनंजय गव्हाले गायिका भाग्यश्री मोरे नृत्य दिग्दर्शक अधीरा बुरकुले यांची आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »