२० वर्ष अभिनय कारकीर्द गाजवल्यानंतर अभिनेता रितेश देशमुख एका आगळ्या वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे . ३० डिसेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘वेड’ या चित्रपटाचे विषेश बाब म्हणजे या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वतः अभिनेता रितेश देशमुख यांनी केले आहे तसेच या चित्रपटाद्वारे अभिनेत्री जिनिलिया देशमुख या मराठी चित्रपटात पदार्पण करत आहेत . या पूर्वी जेनेलिया यांनी हिंदी ,तेलगू ,तमिळ ,कन्नड आणि मल्याळम अशा तब्बल ५ भाषिक चित्रपटांमध्ये काम केले आहे .

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ , विद्याधर जोशी तसेच अभिनेता शुभंकर तावडे व अभिनेत्री जिया शंकर इत्यादी कलाकार या चित्रपटात भूमिका साकारत आहेत .

आघाडीचे संगीतकार अजय अतुल यांनी वेड चित्रपटातील गाणी संगीतबद्ध केली आहेत . तर गीते अजय – अतुल , गुरु ठाकूर यांनी लिहिली आहेत . वेड चित्रपटाची पटकथा रुषिकेश तुराई, संदीप पाटील, रितेश देशमुख यांनी लिहिली आहे तसेच संवाद प्राजक्त देशमुख यांनी लिहिले आहेत . सिनेमॅटोग्राफी भूषणकुमार जैन यांनी केली आहे संकलनाची जबाबदारी चंदन अरोरा यांनी पार पाडली आहे . संदीप पाटील हे कार्यकारी निर्माते आहेत , जिनिलिया देशमुख यांनी वेड चित्रपटाची निर्मिती केली आहे .

रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांच्या मुंबई फिल्म कंपनीला 10 वर्षे पूर्ण झाले आहेत .”वेड’ ही त्यांची सहावी चित्रपट निर्मिती आहे.मुंबई फिल्म कंपनीने आता “देश म्यूजिक” हे म्युझिक लेबल लाँच केले आहे.

रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांच्या ‘वेड’ चित्रपटाची उत्स्कुता सर्वत्र वाढली आहे . IMDB या साईट वर मोस्ट ऍंटीसिपेटेड फिल्म म्हणून पहिल्या क्रमांकावर फिल्म ट्रेंड होत आहे
नुकतेच त्यांच्या चित्रपटातील पहिले गीत ‘ वेड तुझा ‘ प्रदर्शित झाले होते त्या गीताला अल्पावधीत प्रचंड प्रतिसाद मिळाला आता ‘वेड’ च्या निर्मात्यांनी ‘ बेसुरी’ हे गीत प्रदर्शित केले आहे . हे गीत वसुंधरा वी यांनी गायले आहे आणि अजय अतुल यांनी संगीतबद्ध केले आहे .

प्रेक्षकांमध्ये कमालीचा उत्साह निर्माण झाला आहे “वेड “चित्रपट पाहण्यासाठी…

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »