मुंबई : सुशांतच्या जीवाला धोका आहे, याची कल्पना आम्हाला होती. याबाबत आम्ही फेब्रुवारी महिन्यात मुंबई पोलिसांना कळवले होते, तसेच संबंधितांची नावे देखील पोलिसांना सांगितली होती. याबाबत मुंबई पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही. याचा परिणाम असा झाला की शेवटी 14 जूनला सुशांतने आत्महत्या केली. आत्महत्येनंतर देखील पोलिसांना फेब्रुवारी महिन्यातील तक्रारी अर्जावर ज्यांची नावे होती, त्यांच्यावर कारवाई करण्यास सांगितले होते .परंतु मुंबईतील वांद्रे पोलिसांनी याची दखल घेतली नाही .त्यामुळे मला माझ्या मुलाला न्याय मिळणार नाही ही भिती होती. यासाठीच मी पाटणा येथे तक्रार देऊन गुन्हा दाखल केला. खळबळजनक खुलासा सुशांत सिंग चे वडील के.के.सिंग यांनी केला.
.पहिल्यांदा त्यांनी माध्यमांसमोर येऊन तळमळ व्यक्त केली. परंतु पाटणा पोलीस मुंबईत आल्यानंतर मुंबई पोलीस आणि पाटणा पोलीस यांच्यातच संघर्ष सुरू झाला. मुंबई पोलीस बिहार पोलिसांना सुशांत केसबद्दल कुठलेही सहकार्य करताना दिसत नाही. असा आरोप देखील बिहारच्या पोलिसांकडून होत आहे. आता तर चक्क मुंबई पोलिसांनी तपासासाठी आलेल्या आयपीएस अधिकारी, विनय तिवारींना क्वारंटाईन केलंय. त्यामुळे सुशांतला कधी न्याय मिळेल हा प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनात उपस्थित झाला आहे.
अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात दरदिवशी नवीन ट्विस्ट येत आहेत, नवीन खुलासे समोर येत आहेत. सुशांत ला न्याय मिळावा यासाठी सुशांतचे फॅन्स आणि कुटुंबातील सदस्य सातत्याने सीबीआय तपासाची मागणी करीत आहे.
हळूहळू या प्रकरणाला राजकीय रंग देखील येत आहे . बघायला गेले तर मुंबई पोलीस विरुद्ध पाटणा पोलीस आणि बिहार सरकारविरुद्ध ठाकरें सरकार असे देखील चित्र पहायला मिळत आहे . तसेच सुशांतच्या आत्महते सोबत सुशांत ची पूर्व मॅनेजर दिशा सानियाल च्याही आत्महतेचा संबंद जोडला जात आहे. कारण दिशाच्या आत्महत्येनंतर सुशांतची अवस्था ठीक नव्हती असा खुलासा त्याच्या मुंबईत राहणाऱ्या बहिणीने केला आहे. तिने त्याला समजावले देखील होते. परंतु याचा काहीही परिणाम झाला नाही .शेवटी सुशांतने आत्महत्या केली. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात दररोज नवीन, नवीन खुलासे होत आहे. हे प्रकरण दिवसोंदिवस क्लिष्ट बनत चालले आहे .
