पिंपरी चिंचवड : ह्यूमन राइट्स फाउंडेशन आणि साई सोशल अँड स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कोरोना काळात जीवाची परवा न करता उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल
लोककलेतून समाजप्रबोधन करणाऱ्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 101 व्या जयंतीनिमित्त अण्णाभाऊ साठे गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या पुरस्काराचे सोहळ्याचे आयोजन काटेपुरम चौकातील साई सोशल अँड स्पोर्ट्स फाऊंडेशन च्या कार्यालयात करण्यात आले होते. या पुरस्काराचे स्वरूप प्रशस्तीपत्र आणि गौरव ट्रॉफी असे होते.


हे पुरस्कार सांगवी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रंगनाथ उंडे, साई सोशल अँड स्पोर्ट्स फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष फिरोज खान, ह्यूमन राइट्स फाउंडेशनचे अध्यक्ष विक्रांत पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत
अरविंद गोरे (बेस्ट वर्कर र्ऑर्डनन्स फॅक्टरी), सुनील साठे (क्रीडा शिक्षक), सुदेश गायकवाड (क्रीडापटू), नरेश लखन (क्रीडापटू), संतोष येडे (पोलीस उपनिरीक्षक), महादेव मासाळ (पत्रकार), विशाखा सोनकांबळे (पिंपरी चिंचवड सौंदर्यवती), राजश्री अतकरे पवार (न्यूज चॅनल रिपोर्टर)