
पुणे : लोकमत परिवारातर्फे पिंपळे गुरव येथील रक्तदान शिबिरस रक्तदात्यांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला आहे. या रक्तदान शिबिराचे आयोजन रामकृष्ण मंगल कार्यालय येथे करण्यात आले. स्वर्गीय जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
महापौर माई ढोरे यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी माजी स्थायी समिती अध्यक्ष अतुल शितोळे, शशिकांत कदम, नगरसेवक सागर अंघोळकर, नगरसेविका माधवी राजापुरे, चंदा लोखंडे, स्वीकृत नगरसेवक महेश जगताप, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे चिंचवड विधानसभा अध्यक्ष श्याम जगताप, शिवाजी कदम, तानाजी जवळकर.
सामाजिक कार्यकर्ते पोपट जगताप, उमेश बोरचे, अरुण पवार, सांगवी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे, राजेंद्र राजापुरे, संजय गांधी निराधार योजना सचिव संजय मराठे, फिरोज खान, विजय चव्हाण, दिपक सोनकांबळे, ॲड. ज्योती किसे आदी मान्यवर उपस्थित होते.