पुणे : नवऱ्याच्या यशात कायमच पत्नीचा वाटा असतो असे म्हटले जाते. परंतु राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका भारती ताई कदम या नगरसेविका होऊन यशस्वीपणे काम करण्या मागे महत्त्वाची भूमिका त्यांचे पती प्रकाश कदम यांची आहे. प्रकाश कदम यांनी पत्नीमधील संघटन कौशल्य ओळखून त्यांना राजकारणात उतरवले तसेच भक्कम तयार देखील केले. यासाठी भारतीताई आजही त्यांच्या यशाचे श्रेय हे पती प्रकाश कदम यांना देतात.

स्त्रीया फक्त कुटुंबीयांची जबाबदारी पूर्णपणे पार पाडू शकतात असे नाही तर स्त्रियांना जर संधी मिळाली तर समाजासाठी राजकारण करायला त्या सक्षमपणे राजकीय आखाड्यात उतरून सर्वांच्या भुवया उंचावणारे काम देखील करू करू शकतात. कोंढवा प्रभागातील राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका भारती ताई कदम यांनी देखील त्यांच्या पाच वर्षाच्या कारकिर्दीत हे  सिद्ध करून दाखवले आहे. भारती ताई यांनी प्रामुख्याने ई लर्निंग, अहिल्याबाई होळकर हॉल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कोंढवा तील दक्षिण पट्टायाला पाणी पुरवणाऱ्या पाझर तलावाचे बांधकाम स्वतःच्या खर्चाने केले आहे. या तलावामुळे संपूर्ण कोंढवा भागातील दक्षिण पट्ट्याला पाणी मिळते. आजपर्यंत  कुठल्याही नगरसेवकांनी स्वखर्चाने  पाझर तलावाचे काम केले नाही. हे काम फक्त भारतीताई कदम, प्रकाश कदम तसेच त्यांचे बंधू सुरेश कदम यांनी केले. या अनेक गोष्टींमधून कदम कुटुंबियांचा समाज सेवेचा वसा पुढे येतो.

भारतीताईसह  संपूर्ण कुटुंबीय समाजकारण्यासाठी राजकारणात सक्रिय आहेत. अतिशय साधी जीवन पद्धती  भारती ताईंची आहे मात्र  समाजासाठी सर्वोत्कृष्ट काम करण्याचा प्रयत्न असतो.  यामुळेच त्यांनी कोंढवा प्रभागांमध्ये ई लर्निंग, पाझर तलाव, होळकर हॉल सारखी महत्त्वाची कामे केली. कदम कुटुंबीयांनी बांधलेल्या पाझर तलावामुळे आजही कोंढवा भागातील दक्षिण पट्ट्यात दिवसरात्र पाणी मिळते. या तलावाचे काम प्रकाश कदम त्याचे बंधू आणि भारतीताई कदम यांनी स्व खर्चातून केले.

भारतीताई या नेहमीच आपल्याला समाजाचे काही देणे लागते यासाठी पोट तिडकीने काम करीत असतात. निसर्गाबद्दल  विशेष प्रेम असल्याने त्या देश, विदेशातील सर्वच झाडांचे बी रुजवून  रोप तयार करण्याचे काम   छोट्याशा नर्सरीमध्ये करीत असतात.  या नर्सरी मधून तयार झालेली रोपे दर  वर्षी नागरिकांना भेट म्हणून देत असतात.  दरवर्षी प्रकाश कदम आणि त्यांच्या सौभाग्यवती भारतीताई कदम या पाच लाख रोपांचे वाटप करतात. या बाबीमुळे पर्यावरण संरक्षणाचा  आगळा-वेगळा संदेश ही मंडळी नागरिकांना देतात. सध्या सर्वत्र  निर्माण होणाऱ्या सिमेंटच्या काँक्रीटच्या जंगलांना अशा पद्धतीचा पर्याय असू शकतो हे भारतीताई कदम यांच्या आगळ्यावेगळ्या कामामुळे सिद्ध  झाले आहे.

भारतीताई त्यांच्या नर्सरीसाठी पाण्याचा तुटवडा बघता महानगरपालिकेचे पाणी न वापरता बोरचे पाणी वापरतात. भारती ताईंची नर्सरी बाराही महिने हिरवीगार असते.  त्या बाबीतून एवढे मात्र  सिद्ध होते की भारतीताई कदम यांनी त्यांच्या 60 ते 70 हजार लोकसंख्या असणाऱ्या प्रभागातील नागरिकांच्या सर्व समस्यांचा अभ्यास करून त्यावर पर्यायी मार्ग शोधले होते.

भारतीताई या जेव्हा बालाजी नगर येथे राहत होत्या. तेव्हा त्या भागांमध्ये ड्रेनेज लाईन, वीज  तसेच पाण्याची भीषण समस्या होती. तिथे पिण्यासाठी पाणी उपलब्ध नव्हते. त्यावेळी भारतीताई स्वताहा हंड्याने पाणी भरत होत्या. परंतु याबाबत कधीही कुणाकडे तक्रार केली नाही.  परंतु आज जर एक दिवस पाणी आले नाही तर त्यांच्याकडे  नागरिक पाणी न येण्याची तक्रार घेऊन जातात. त्यावेळी जुन्या  दिवसांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. बालाजीनगर येथेही ड्रेनेज लाईन, विजेचे तसेच गरिबांच्या मुलींच्या लग्नासाठी कायमच ताई मदत करतात.

भारतीताई यांचे शिक्षण जरी नववीपर्यंत झाले असले तरी त्यांच्यामध्ये प्रत्येकाला सामावून घेण्याची  कला आहे. ताई  कायमच मधुर संभाषणाने प्रत्येकाला आपलसं करून सोडतात.  कुटुंब, नर्सरी सांभाळून कायमच समाजाला काही देणे लागत या भावनेतूनच इतरांसाठी काम करीत असतात.

चक्क घरातील कामे सांभाळत, सांभाळत अगदी सहज मैत्रिणीच्या मुलीच्या लग्नाच्या रुखवतातील लोणची, पापड देखील खूप सहज बनवताना.  त्यांच्या या स्वभावामुळेच त्या प्रत्येक व्यक्तीला आपल्याच ताई वाटतात. यासाठी  प्रत्येक व्यक्ती  खाजगी किंवा इतर समस्या घेऊन त्यांच्याकडे जातात. आणि भारतीताई देखील  कुटुंबीया याप्रमाणेच ती समस्या पटकन सोडवतात.

भारती ताई यांना निवडणुक लढवण्यासाठी प्रकाश दादा यांनी तयार केले. त्यावेळी भारतीताई खूप घाबरल्या होत्या. कारण या आधी त्या फक्त कुटुंबाची जबाबदारी सांभाळत होत्या. इतकी वर्ष घरात राहून समाजात कसे जायचे किंवा लोकांशी कसे बोलायचे,  भाषण कसे करायचे हे त्यांना अवगत नव्हते. राजकारण आपल्याला जमेल की नाही हे दडपण कायम त्यांच्या मनावर होते. परंतु प्रकाश कदम यांनी ताईंना धीर दिला. ताईंना सांगितले की तु  उत्कृष्टपणे घर सांभाळणारी महिला आहेस यासाठी तुम्ही राजकारणही उत्कृष्टपणे करू शकता. हा ठाम विश्वास भारतीताई मध्ये निर्माण केला.  यानंतर भारती ताईनी एका नगरसेवकांमध्ये जे गुण असतात ते हळूहळू आत्मसात करायला सुरुवात केली.
प्रभागातील नागरिकांच्या घरोघरी जाऊन समस्या जाणून घेतल्या. त्या सोडवण्यासाठी कोणती पद्धत आहे हे प्रकाश कदम यांच्याकडून समजून घेऊन त्या पद्धतीने काम करायला सुरुवात केली. यामुळे त्या पहिल्याच प्रयत्नात नगरसेविका म्हणून निवडून आल्या. परंतु हा आनंद त्यांना साजरा करता आला नाही, कारण त्यांच्यासोबत जे उभे होते ते निवडून येऊ शकले नाहीत.

भारतीताई या जिवनातील सर्वच प्रसंगांना व घटनांना सारखेच महत्त्व देतात. मग ती प्रकाश कदम व त्यांची लग्नगाठ असो. किंवा त्या तीन वेळा आई झाल्याचा आनंद असो  किंवा नगरसेविका होण्याचा मान त्यांनी पटकावला असो. त्या सांगतात की जीवनातील सर्वच घटना आणि प्रसंग त्यांचे जीवन समृद्ध करत गेले. 

भारती ताईंची एक सवय आहे ती म्हणजे  पडेल ते काम करण्याची. या सवयीनेच त्यांचा जीवन प्रवास घडवल्या हे त्या सहजपणे मान्य करतात. तसेच राजकारणात भारती ताईंना  प्रकाश दादांनी उभे केले हे जरी सत्य असले तरी प्रकाश दादांनी त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहायला शिकवले. कारण प्रकाश दादा म्हणतात महिलांना देखील सर्व जबाबदारी पेलता आलीच पाहिजे. यासाठी  त्यांनी  पत्नीला व मुलीला देखील राजकारणात सक्षम केले. या दोघीही राजकारणात सक्रिय असून उत्तम पद्धतीने काम करीत आहेत.

भारतीताई यांनी त्यांच्या  तिन्ही मुलांना देखील चांगले शिक्षण देऊन उत्तम संस्कार केले आहेत. त्यांची मुलगी प्रेरणा बलकवडे या देखील राष्ट्रवादीच्या नाशिक शहराच्या महिला जिल्हा अध्यक्ष आहेत. तर मुले देखील राजकारणात सक्रिय आहेत. प्रतीक कदम आणि प्रणव कदम यांनी देखील समाजसेवेला वाहून घेतले आहे. आंबील ओढा फुटल्याचे जी घटना आहे. या दुर्दैवी घटनेमध्ये या दोन्ही मुलांनी खूप काम केले. प्रत्येकाच्या घरात जाऊन  पाणी काढले. त्यांना सर्वतोपरी आधार दिला. याकाळात  प्रकाश कदम हे  आजारी होते. पोटाच्या शस्त्रक्रियेमुळे हास्पिटलला उपचार घेत होते. परंतु प्रतिक व प्रणव कदम या दोन भावांनी कुठेही वडिलांची कमतरता नागरिकांना जाणवू दिली नाही.  24 तास कोंढवा परिसरातील नागरिकांसाठी दोघेही काम करत होते. आजही तेथील नागरिकांना  नुकसानाची भरपाई मिळावी म्हणून अविरतपणे प्रकाश कदम प्रयत्न करीत आहेत.

भारती ताईंना राजकारणातील चांगले, वाईट असे दोन्ही अनुभव आहेत. हे सर्व अनुभव पाठिशी ठेवून समाजासाठी काम करतात. त्यांच्याकडे आलेली कुठलीच व्यक्ती  रिकाम्या हाताने परत जात नाही.
व्यक्तीची समस्या सोडवण्यासाठी भारतीताई सक्षम आहेत. तसेच त्या प्रत्येकाच्या पाठीमागे सक्षम पणे उभ्या राहतात. अशा या वारकरी संप्रदायातील समाजसेवेचा वसा धारण केलेल्या कदम कुटूंबियांतील समाजाशी एकनिष्ठ असलेल्या माजी नगरसेविका भारतीताई कदम यांना द पब्लिक व्हॉइस  न्यूज चा मानाचा मुजरा.

Please follow and like us:
Pin Share

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »