पुणे शहर भाजपच्या शिष्टमंडळाची पोलीस आयुक्तांकडे मागणी

पुणे : पुण्यात नुकत्याच झालेल्या एल्गार परिषदेत हिंदूच्या भावना दुखावणारी, धार्मिक तेढ निर्माण करणारी आणि संविधानाला विरोध करणारी आक्षेपार्ह वक्तव्ये करणार्‍या अलिगड मुस्लिम विद्यापीठाचा माजी विद्यार्थी शरजील उस्मानी याच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा आणि वादग‘स्त एल्गार परिषद आयोजित करणार्‍या आयोजकांवर तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा तीव‘ जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा पुणे शहर भाजपचे अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिला.

या संदर्भात शहर भाजपच्या शिष्टमंडळाने आज पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना निवेदन दिले. शहराध्यक्ष जगदीश मुळीक, महापौर मुरलीधर मोहोळ, माजी खासदार प्रदीप रावत, आमदार भीमराव तापकीर, मुक्ता टिळक, सिद्धार्थ शिरोळे, उपमहापौर सरस्वती शेंडगे, सरचिटणीस गणेश घोष, दीपक नागपुरे, राजेश येनपुरे, दत्ता खाडे, संदीप लोणकर, युवा मोर्चाचे अध्यक्ष राघवेंद्र मानकर, तक्रारदार ऍड प्रदीप गावडे उपस्थित होते.

मुळीक पुढे म्हणाले, ‘सत्तेसाठी शिवसेनेने हिंदुत्वापासून फारकत घेतली आहे. महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर पालघर येथे हिंदू साधुंची हत्या, सावरकरांचा अवमान, हिंदूंना जाणीवपूर्वक सापत्न वागणूक देणे असे प्रकार घडले आहेत. याबाबत शिवसेना मूग गिळून बसली आहे. शरजील उस्मानी सारख्या गुन्हेगारी पार्श्वभूमी असणार्‍या व्यक्तिने राज्यात येऊन हिंदूचा अवमान करणारी वक्तव्ये केल्यामुळे जनतेमध्ये संतापाची भावना आहे. चार दिवस उलटून गेल्यावरही उस्मानीवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेची मान शरमेने खाली गेली आहे. शासनाने तातडीने पावले उचलून उस्मानी आणि एल्गार परिषदेचे आयोजन करणार्‍या संस्थांवर कठोर कारवाई करावी. अन्यथा तीव‘ जनआंदोलन केले जाईल.’

महापौर मोहोळ म्हणाले, ‘शरजिल उस्मानी यांनी भारतीय संघराज्य आणि हिंदूंच्या विरोधात अतिशय आपत्तीजनक आणि भडकावू विधाने केली आहेत. भारतीय संघराज्याला न जुमानन्याचा हा प्रकार अतिशय गंभीर आहे. हा एकप्रकारे भारतीय संघराज्यावरील हल्ला आहे. शरजील केवळ हिंदू समाजाबद्दल बोलला नाही तर भारतीय न्यायव्यवस्था, कायदेमंडळ, पोलीस आणि प्रशासकीय व्यवस्थेचा अपमान केला आहे. पोलीसांनी उस्मानीवर आणि एल्गार परिषदेचे आयोजन करणार्‍या संस्थेवर तातडीने कारवाई करावी.’

माजी खासदार प्रदीप रावत म्हणाले, ‘पुण्यात ३१ डिसेंबर २०१७ रोजी एल्गार परिषद आयोजित केली होती. याचे आयोजनात भारतीय कम्युनिस्ट पार्टी (माओवादी) या प्रतिबंधित संघटनेचा हात होता. शरजीलवर यापूर्वी हिंसाचाराचा गुन्हा दाखल आहे. तरीही त्याला यावर्षी परिषदेत निमंत्रित करण्यात आले. त्याने अतिशय आक्षेपार्ह विधाने केली आहेत. तसेच परिषदेच्या ठिकाणी खोटा इतिहास, जातीय तेढ निर्माण करणारी, महापुरूषांचा अवमान करणारे साहित्य असणारी पुस्तककांची विक‘ी करण्यात आली. याचा सखोल तपास करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी.’

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »