पुणे : पुण्यातील चाकण चौकात वाहातुक पोलिसांसोबत किरकोळ कारणावरुन वाद घालत डोक्यात रॉड घालणाऱ्या दोघां तरुणांना पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तांच्या युनिट 3 ने रात्री उशीरा ताब्यात घेतले. रोहीत बाबू साळवी आणि हर्षदीप भारत कांबळे असे आरोपींचे नावे आहेत. शनिवारी दुपारच्या सुमारास चाकण चौकात पोलिस हवालदार रवींद्र करवंदे वाहतुक नियमन करत असताना कंटेनर पाठीमागे घेणावरुन आरोपी व वाहतूक पॉलिसांमध्ये वाद झाला.
त्या वादाचे रुपातंर हाणामारीत झाले. आणि चक्क वाहातुक पोलिसांच्या डोक्यातच रॉड मारून हे दोन्ही आरोपी टू विलवर पसार झाले. त्यांनतर पोलिस दलात मोठी खळबळ उडाली होती. घटनेचा हा सगळा थरार सिसिटीव्ही कैद झाला होता. या पुटेज च्या मदतीने या दोन्ही आरोपींना पकडण्यात यश आले.
चाकण पोलिसासह युनिट 3 याचा संमातर तपास करत आसताना पोलिसानी दोघाना ताब्यात घेतलय