
पुणे : महापालिकेचे (21-22) तब्बल ७ हजार ६५० कोटी रुपयांचे अंदाजपत्रक शुक्रवारी स्थायी समितीसमोर मांडण्यात आले. जुन्या प्रकल्पांना गती देण्यासाठी शहर विकासाचे मॉडेल अधिक मजबूत करण्याचे नियोजन अंदाजपत्रकात केले आहे.महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी स्थायी समितीकडे हे अंदाजपत्रक सादर केले. महापौर मुरलीधर मोहोळ, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासणे, सभागृह नेते गणेश बीडकर, उपमहौपोर सरस्वती शेंडगे, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल उपस्थित होत्या.या बजेट मध्ये केंद्र ,राज्य सरकारच्या योजनाना गती देण्याकरताही विशेष बजेटची तरतुद करण्यात आली. त्याचबरोबर महापालिकेच्या वाहनाच्या ताफ्यात इलेक्ट्रिक गाडया घेण्याबद्दल तरतुद करण्यात आली आहे.