महाराष्ट्राच्या कन्या खासदार रक्षाताई खडसे यांची बदनामी भाजपच्या साईटवर झाली हे निषेधार्ह आहेच. कदाचित त्यांचे हे संघी संस्कार असतील. परंतु तुम्ही Twiter वर परत retwiter करून आपणही तेच करत आहात. अजूनही आपण ती डिलिट केलेली नाही. कदाचित ही त्या ताईंची बदनामी असेल. प्रत्येक कर्तृत्वान स्त्रीचा अपमान झाला नाही पाहिजे, हीच आपल्या शिवरायांच्या महाराष्ट्राची संस्कृती आहे.

जिजाऊ-सावित्री-अहिल्या च्या महाराष्ट्रात आपण गृहमंत्री आहात. त्याच महाराष्ट्रात लोकांनी निवडून दिलेल्या महिला खासदार रक्षाताई खडसे यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर आहे, तो अजूनही आपण Twiter वर तसाच ठेवलेला आहे, हे माझ्या मते गृहमंत्री पदाला शोभणार नाही. महाराष्ट्राला दिशा हे ‘घटनात्मक’ पद देत असते. तुम्ही जर ही चूक केली तर मग महाराष्ट्राला दिशा कोण देणार…! त्यांनी हटवले तुम्हीपण हटवा.

‘जिजाऊ’ ही आमची सर्वोच्च अस्मिता आहे. म्हणून महिलेचा असा ‘अपमान’ संभाजी ब्रिगेड चा कार्यकर्ता म्हणून आम्ही सहन करू शकत नाही. कृपया आपले रिट्विट (Retwite) तात्काळ डिलीट करावे.


byte
संतोष शिंदे,
प्रदेश संघटक, संभाजी ब्रिगेड, महाराष्ट्र