पुणे : आगामी दोन हजार बावीसच्या महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला आता पासून सुरुवात झाली आहे. लोकांशी आपला जनसंपर्क अधिक व्यापक पध्दतीने व्हावा तसेच लोक प्रतिनिधी आणि लोकांमध्ये थेट संवाद असावा या उद्देशाने पुण्यातील हांडेवाडी परिसरातील भारतीय जनता पक्षाचे लोकप्रतिनिधी संजय अण्णा सातव यांनी जनसंपर्क कार्यालय सुरू केला आहे.
भारतीय जनता पक्षाचे हडपसर भागाचे माजी आमदार योगेश टिळेकर आणि पुणे शहर भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या हस्ते जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करून संजय सातव यांनी अप्रत्यक्षपणे आगामी महानगरपालिका निवडणुकीच रणशिंग फुकल आहे.
संजय सातव आपल्या या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून हडपसर, ससाणे नगर, सयदनगर, हांडेवाडी, काळेपडळ आणि महंमद वाडी भागातील नागरिकांच्या समस्या अधिक व्यापक पध्दतीने सोडवू शकतील असा विश्वास यावेळी योगेश टिळेकर यांनी व्यक्त केला.
Byte : संजय अण्णा सातव ( भाजप लोकप्रतिनिधी )