पुणे : मोदी सरकारने केलेल्या इंधन दरवाढीच्या विरोधात, पुणे शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने तिव्र आंदोलन करण्यात आलं.काँग्रेसचे राज्याचे सचिव अभय छाजेड यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सातारा रोडवर आंदोलन करत इंधन दर वाढी विरोधात आंदोलन केल. यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केंद्रातील मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
यु पी ए सरकारच्या काळात आंतराष्ट्रीय बाजार इंधनाचे दर खुप जास्त असताना देखिल यु पी ए सरकारने सर्वसामान्य लोकांना इंधन अत्यल्प दरात विक्री केलं. मात्र एन डी ए सरकारच्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर खुप कमी असताना देखिल एन डी ए सरकार खुप जास्त दर आकारून लोकांना इंधन विक्री करत आहे. ही एक प्रकारे सर्वसामान्य जनतेची लूट आहे.
2014 ला यु पी ए ची सत्ता असताना केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या इंधन दर वाढी विरोधात सारख रस्त्यावर उतरून आंदोलन करायच्या. मात्र आता स्मृती इराणी कुठे गेल्या त्यांना आता इंधन दर वाढ दिसत नाही का असा सवाल यावेळी अभय छाजेड यांनी उपस्थित केला.