पुणे : तब्बल नऊ ते दहा महिन्यानंतर शाळेची घंटा वाजणार. तसेच शाळेमध्ये विद्यार्थ्यांची गर्दी दिसणार. सरकारने दिलेल्या गाईडलाईन प्रमाणे कमीत कमी दोन महिने तरी प्रॅक्टिकली शाळा घेतली पाहिजे हा निकष करण्यात आला. हाच निकष निकष पुढे ठेवून सर्वत्र सातवी ते बारावी पर्यंत ची शाळा सुरू झाली. शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये कमालीचा उत्साह आणि मित्रांना भेटल्याचा आनंद दिसून येतो. असाच आनंद औंध येथील स्पायसर स्कूलच्या विद्यार्थ्यांमध्ये देखील दिसून आला.
कोविड नाइंटिन लॉक डाऊनमुळे जवळपास दहा महिन्यांपासून बंद शाळा होत्या. सोशल डिस्टन्स आणि इंडिव्हिडुल फिजिकल फिटनेस चेकअप आदी नियमांच काटेकोरपणे पालन करून स्पायसर स्कूल सुरु झाली. अशी माहिती द. पब्लिक व्हाईसशी बोलताना पुणे महानगर पालिकेचे सहायक शिक्षण अधिकारी शिवाजी भोकारे यांनी दिली.
सर्वत्र शाळा सुरू झाले आहेत, परंतु जर कुठल्याही शाळेने सोशल डिस्टंसिंग नियमांमध्ये हलगर्जीपणा केला तर त्या शाळेवर कडक कारवाई करण्यास देखील मागेपुढे बघितले जाणार नाही असेही त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांच शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून, आम्ही आमची स्पायसर स्कुल सुरू केली. सोशल डिस्टंसिंग, मास्कचे वापरण्याचे सर्व नियम पाळून शाळा सुरू केली. स्कुल मधील सर्व वर्गाचं दरदिवशी सॅनिटायजेशन करण्यात येत आहे. प्रत्येक येणाऱ्या विद्यार्थ्यांच टेम्परेचर आणि ऑक्सिजन लेव्हल चेक करून स्कुल मध्ये प्रवेश देण्यात येतो. विद्यार्थी वर्गात प्रवेश करताना हात सॅनिटाईज करतील तसेच सोशल डिस्टन्स पाळून बसतील अशी आसन व्यवस्था करण्यात आली आहे. शाळेत विद्यार्थ्यांना मास्क घालून राहणे अनिवार्य करण्यात आलं आहे. त्याच बरोबर अलटरनेटिव्ही पध्दतीने विद्यार्थ्यांना वर्गात बोलवून त्यांचं शैक्षणिक तास पुर्ण केल्या जात आहेत. अशी माहिती पब्लिक व्हाईशी बोलताना स्पायसर स्कूलचे प्रिन्सिपल एस. एम. गायकवाड यांनी दिली.
पुण्यामध्ये सर्वात पहिले विद्यार्थ्यांचे ऑनलाईन क्लासेस स्पायसर स्कूल न घेतले. अशी माहिती स्कूलचे हेडमास्टर मोसेस नवरंगी यांनी दिली. यामुळे आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे आम्ही शैक्षणिक नुकसान होऊ दिले नाही हा दावा देखील त्यांनी केला.
स्कुलने घेतलेल्या खबरदारी मुळे पालक देखिल आपल्या पाल्याना मोठ्या उत्साहाने स्कुल मध्ये पाठवू लागले आहेत. स्कुल स्टँडर ऑपरेटिंग प्रोसिजरचे पुर्ण नियम काटेकोरपणे पाळत असल्याने विद्यार्थ्यांच्या मनातील कोरोना इन्फेक्शनची भीती देखिल आता नाहीशी झाली आहे. तसेच वर्ग मित्रांना व मैत्रिणींना प्रत्यक्ष भेटण्याचा आनंद देखील स्पायसर मधील विद्यार्थ्यांनी व्यक्त केला .