पुणे : सकाळी पावणे नऊच्या दरम्यान वेताळ टेकडीवर मित्राबरोबर माॅर्निऺग वाॅकला गेलेला तरुण टेकडीवरून घसरून खाणीत पडला. त्यांचा आवाज एकटाच सामक दलाचे जवान आणि तो तरुण त्यांनी त्या तरुणाला सुखरूप बाहेर काढले आणि पुढील उपचारासाठी ऍम्ब्युलन्समध्ये हॉस्पिटल ला पाठवले.


तनिष्क विशाल लोढा वय वर्ष अऺदाजे १६, हा युवक पाय घसरून खाणीत पडला. नागरिकांचा आरडाओरडा ऐकून वेताळ टेकडी वर ड्युटीवर असलेले फायरमन सऺजय भावेकर यांनी आवाज ऐकला.  त्वरित खाणीत खाली उतरले. त्याच दरम्यान त्यांनी एरऺडवणा अग्निशमन केऺद्राची मदत मागितली, समक दलाचे जवान भावेकर याऺनी  त्या युवकाला पाण्याच्या कडेला आणले, दरम्यान एरऺडवणा अग्निशमन केऺद्राची टीम स्टेशन आॅफीसर राजेश जगताप, फायरमन सचिन आयवळे, सचिन वाघोले, जितेंद्र कुऺभार, शुभम गोल्हर, आनंद काऺबळे, ड्रायव्हर. अमोल शिऺदे, सागर सोनवणे हे घटनास्थळी पोहोचले. जाळीच्या साह्याने जखमी युवकास खाणीतून वर काढले, आणि पुढील उपचारासाठी महाराष्ट्र शासनाचे अॅम्ब्युलन्स मधून रवाना केले.

नागरिकांनी फायरमनच्या प्रसंगावधानामुळे त्या तरुणाचा जीव वाचला योग्य वेळी त्याला बाहेर काढून त्याच्यावर उपचार होऊ शकले.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »