पुणे : घरात भाजली जाणारी ‘भाकरी’ उद्या पिझ्झा मागवल्या सारखी ‘ऑनलाईन’ अदानी-अंबानीच्या कंपनीकडून मागवावी लागेल. म्हणून विरोध करावा लागेल. ही भूमिका घेत शेतकऱ्यांच्या बंदला संभाजी ब्रिगेडने देखील पाठिंबा दिला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयापुढे संभाजी ब्रिगेडच्या वतीने निदर्शने करून आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांच्या विरोधात असणारा कायदा मागे घेण्यात यावा असे निवेदन देखील जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.

यावेळी संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे द पब्लिक व्हाईस न्यूजशी बोलताना म्हणाले की, शेतीमाल विक्री कायदा 2020 बऱ्याच कालावधीपासुन शेतकरी त्यांच्या मालाला आधारभुत किंमत मिळावी म्हणून स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागु करा म्हणत असताना शेतीमाल विक्री कायदा लागु करून कृषी उत्पन्न बाजार समीतीचे खच्चीकरण करूण भांडवलशाही व्यवस्था निर्माण करण्याचा घाट घातला जात आहे.

मोदी सरकार शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याच्या मार्गावर आहे. शेतकरी विरोधी कायदे करून ‘अदानी-अंबानी’ या भांडवलदारांच्या हातात देश देण्याच्या हालचाली सुरू आहेत. तो तात्काळ थांबला पाहिजे व शेतकरी विरोधी शेतीमाल विक्री कायदा 2020, कंत्राटी शेती कायदा 2020, अत्यावश्यक वस्तु कायदा हे कायदे रद्द करावे, स्वाभिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, दिल्लीतील आंदोलक शेतकऱ्यांवरील गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव मिळायला हवाच यासाठी भारतात सर्वत्र जोरदार आंदोलन सुरू आहे.



‘