पुणे : 26 /11 मधील शहिदांचा तसेच घटनेचा समावेश पाठ्यपुस्तकात करावा अशी मागणी राज्य शासनाकडे केली असल्याची माहिती पोलीस मित्र संघटना महाराष्ट्र राज्य संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कपोते यांनी दिली. बालगंधर्व परिसरात 26/ 11च्या शहिदांना श्रद्धांजली अर्पण सोहळ्यात आयोजित करण्यात आला होता. यावेळी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र बोलत होते. यावेळी डेक्कन वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक किरण बालवडकर, डेक्कन पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक शिल्पा लम्बे, पोलीस उपनिरीक्षक घावटे, नगरसेवक प्रशांत बधे, पीएमटी चे माजी अध्यक्ष चंद्रशेखर कपोते आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी 26/ 11 च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या शहिदांना पुष्पचक्र तसेच मेणबत्त्या पेटवून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी 26/ 11 च्या घटनेलाही उजाळाही देण्यात आला. पुणे पोलिसांना कोरोनाच्या काळात संरक्षण मिळावे म्हणून सेनेट रायझर आणि मास खरेदी करण्यासाठी संघटनेच्या वतीने आर्थिक मदतही करण्यात आली.