
पुणे : पुणे ग्रामीण परिसरात अवैध दारूचे पाच कॅन हवेली पोलिसांनी छापा टाकून जप्त केले. अवैध दारू वाहतूक करण्याबाबत हवेली पोलिसांनी होमगार्डची मदत घेऊन विपुल गायकवाड या इसमाला इसमाला ताब्यात घेतले. या आरोपीकडे अवैध दारू साठा बाबत बाबत विस्तृत चौकशी करण्याचे काम सुरू आहे.

या अवैध दारूच्या वाहतुकीसंदर्भात हवेली पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांनी माहिती देताना सांगितले की, हवेली पोलिस स्टेशन कडून अवैध दारू आणि जुगार अड्ड्यांवर धडक कारवाई करण्यात येत आहे. या कारवाई अंतर्गतच हवेली परिसरात 175 लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली. ही दारू वाहतूक करण्यासाठी इंडीका कारच्या वापर करण्यात आला होता. तसेच यावेळी जुगाराचे साहीत्य, मोबाईल असा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला. आत्तापर्यंत दोन आरोपींना अटक करण्यात आली.