पुणे : उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज जिल्हा परिषदेच्या माध्यमातून फिरती माती, पाणी व पानदेठ परिक्षण प्रयोगशाळा असलेल्या ॲग्रो ॲम्बुलन्सचे लोकार्पण करण्यात आले. शेतक-यांच्या सेवेत ही सेवा दाखल होत आहे.
विधानभवन प्रांगणात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे,कृषी व पशूसंवर्धन समितीचे सभापती बाबुराव वायकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.