पुणे : नृत्यांगना प्रियंका काळे यांची बहीण नृत्यांगना विशाखा काळे हिने दुपारी राहत्या घरी परिस्थितीला कंटाळून आत्महत्या केली.  प्रसिद्ध निर्माते  मनोज माझिरे यांच्या महाराष्ट्राची गौरव गाथा तसेच अरुण गायकवाड यांच्या गर्जा हा महाराष्ट्र या कार्यक्रमात दोघी बहिणी नृत्यांगना म्हणून काम करत होत्या. कोरोना च्या महामारी ने गेली सहा महिने कुठलेच काम नसल्याने आणि घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची असल्याने विशाखा काळे हिने आज आपला जीवन प्रवास संपवला. घरी आई आणि वडील  दोघेही अंध आहेत .घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे.


गेल्या सहा महिन्यात कसलेही काम नाही आणि म्हणून शेवटी या परिस्थितीला कंटाळून हाताश होऊन  आत्महत्या केली. वैकुंठ स्मशानभूमी पुणे येथे  केवळ 6 लोकांच्या उपस्थितीत अंतिम संस्कार करून विशाखा काळे  गुणी कलाकाराला शेवटचा निरोप देण्यात आला.

पाच सहा महिने काम नसल्याने विशाखा आतून  खचली होती. गेल्या सहा महिन्यांपासून जगावं की मरावं हा प्रश्न  भेडसावतोय तेव्हा. यांनातर तरी सर्व  कलाकारांनी या  गोष्टीचा विचार करून शासनाला जागं करायला हवं .अन्यथा रोज अशा आत्महत्या  घडेल अशी खंत आता सर्व कलाकार उपस्थित करीत आहे.
विशाखा काळे हिचे आई वडील अंध आहेत घरात.त्यांना  आधार द्यायला कुणीही नाही. तेव्हा कलाकारांनी  शक्य आहे तशी  मदत करावी असे आवाहन अरुण  गायकवाड यांनी केले.

Please follow and like us:
Pin Share

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »