पुणे :महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीचा अविभाज्य घटक असलेला “वडापाव” हा दिवसेंदिवस अधिक लोकप्रिय होत आहे. प्रत्येक शहरामध्ये वडापाव खाण्यासाठी काही ठराविक ठिकाणे असतात.सध्या पुण्यनगरी म्हणजेच पुण्यामध्ये नव्यानेच बहुचर्चित असलेलं ठिकाण म्हणजे “BIGG वडापाव”अल्पवधीत प्रसिद्ध झालेला हा वडापाव आपला लाडका शेफ पराग कान्हेरे याचा आहे.
“बिगबॉस “मराठी चा दुसरा सिझन खूपच लोकप्रिय होता .त्यामधील शेफ पराग चा प्रवास हा प्रेक्षकांना खूपच भावला होता.एक स्पर्धक असलेल्या घरातल्या राजकारणाला बाली पडलेला पराग शो मध्येच बोलला होता कि “मी वडापावची गाडी टाकेन पण अन्याय सहन करणार नाही”. महाराष्ट्राच्या प्रेक्षक वर्गाने परागच्या तडफदार स्वभावाचे कौतुक केले आणि ‘BIGG”वडापावच्या पहिल्या शाखेला भरभरून प्रतिसाद दिला.
कर्वेनगर भागात जून महिन्यामध्ये अनेक अडचणींच सामना करत BIGG वडापावची पहिली शाखा सुरु झाली. एका ब्रँड ची निर्मिती करत असताना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे “लोगो” प्रथमदर्शनीच आवडणारा हा “BIGG वडापाव” चा लोगो बनविला आहे.मुकुल भातखंडे यांनी शेफ पराग च्या चेहऱ्याचा वापर करून बनविलेला “MASCOT”खूपच कलाकुसरीने बनविला आहे.
येत्या २ ओक्टोम्बर ला बिगवाडापावच्या अजून दोन शाखांचे उदघाटन होत आहे . लक्ष्मी रोडवरील विजय टॉकीज च्या चौकामध्ये सारे भारत भोसले हे शाखा उघडत आहे . तसेच कोथरूडमधील यशवंतराव चव्हाण नाट्य गृहाजवळ श्री शाम देशमुख हे शाखा उघडत आहेत.
वडापावची विशेष आवड असणारे हे दोघेही जण बिगवाडापावच्या कर्वेनगर शाखेत नेहमी वडापावचा आस्वाद घ्यायला यायचे . हि एक उत्तम व्यवसाय संधी असल्याचे लक्षात येताच अजून दोन शाखा चालू करण्याचा निर्णय लगेचच त्यांनी घेतला.
काहीतरी हटके कारण्यासाठी प्रसिद्ध असलेला शेफ पराग वडापावची अनेक प्रकार बनविण्यात यशस्वी झाला आहे.”खर्डा”प्रकारामध्ये चुलीवर बनविलेल्या खर्डा चा स्मोकी स्वाद आहे.तर “भरीत वडापाव” मध्ये विदर्भातल्या वांग्याच्या भारताचं आणि बटाट्याचं उत्तम मिशन आहे . कांद्याचं सलाड ,लसूण शेव ,खजूर चटणी चीज चा वापर करून बनविलेला “रॉयल”खवैयांची पहिली पसंती आहे. चटपटीत मसाला ,कुरकुरीत चुरा घातलेला “चुरा पाव ” हा एक खूपच नाविन्यपूर्ण प्रकार आहे .
महात्मा गांधींच्या जयंतीच्या शुभमुहूर्तावर दोन्ही शाखांचे उदघाटन करत असताना २ ओक्टोम्बर रोजी “BIGG वडापावच्या कर्वेनगर ,लक्ष्मी रॉड आणि कोथरूड शाखेमध्ये वडापाव फक्त रु. १० ला उपलब्ध असेल . सर्व खवैयांनी या ऑफर चा लाभ घ्यावा.