पुणे : खुनाचा प्रयत्न आणि ॲट्रॉसिटी मधील फरार आरोपीला सापळा रचून स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. सोमवारी बारामती विभागात पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय बातमीदार मार्फत आरोपी बद्दल माहिती मिळाली .
या आरोपीवर माळेगाव येथे सासवड पो स्टे गु र नं १०६/२०२० भा द वी 307,324 , सह अनु जाती जमाती प्रतिबंधक कायदा 1989 कलम 6 सुधारीत कायदा 2015 चे 3(१) (r)(s) 3(2) (va) आधी पुणे आरोपी वरती दाखल होते. आरोपीचे नाव नितीन उर्फ बापू उल्हास जाधव ( वय 32 वर्षे)आहे. हा आरोपी रा. इंदिरा नगर ,सासवड ता पुरंदर* जि. पुणे येथील रहिवासी आहे. हा आरोपी गेली सहा महिने पासून फरार होता. पुढील तपास करीत सासवड पोलिस स्टेशन च्या ताब्यात दिले आहे.
या आरोपीवर १)सासवड पो स्टे गु र नं 142/2014 भा द वी का कलम 307, 143, 147 इतर
२) सासवड पो स्टे गु र नं 90/2018 भा द वी का कलम 326,325, 109,34 आदी गुन्हे दाखल आहेत.
सदरची कारवाई ही स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शिवाजी ननावरे, पो. हवा अनिल काळे, पो. हवा रविराज कोकरे, पो. हवा ज्ञानेशवर क्षीरसागर पो. ना विजय कांचन,पो.शि. धिरज जाधव
पो.शि. अक्षय नवले यांनी पार पडली.

