आमदार चंद्रकांत पाटील यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद

पुणे : कोरोनाग्रस्तांवर उपचारासाठी प्लाझ्मा थेरपी उपयुक्त ठरत असल्याने; त्यातच पुण्यात सध्या चार हजारांहुन अधिक कोरोना रुग्णांना प्लाझ्माची गरज भासत आहे. मात्र, प्रत्यक्षात 200 रुग्णांनाच पूरेल इतका प्लाझ्मा साठा उपलब्ध असल्याची माहिती पुढे आली होती. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरुड विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी सुरु केलेल्या प्लाझ्मादान उपक्रमास महिलांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत असून, मतदार संघातील सोनाली जाधव यांनी रविवारी प्लाझ्मा दान केला आहे. सोनाली या कोथरुडमधील पहिल्या महिला प्लाझ्मादात्या ठरल्या आहेत.

गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात प्लाझ्माची मागणी वाढली आहे. मात्र, कोरोनावर यशस्वी मात केल्यानंतर प्लाझ्मादानासाठी फारसे कोणी पुढाकार घेत नसल्याचे चित्र होते. शहरातील काही रक्त्पेढ्यांकडे प्लाझ्मासंकलनाचे काम सुरु असले तरी, प्लाझ्मादात्यांचा शोध घ्यावा लागत आहे. तर काही ठिकाणी रुग्णालयातील कोरोनामुक्त कर्मचाऱ्यांनाच प्लाझ्मादानासाठी पुढाकार घ्यावा लागत आहे.

त्यामुळे शहरातील प्लाझ्माची वाढती गरज ओळखून भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी आपल्या मतदारसंघात प्लाझ्मादानाचा उपक्रम सुरु केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पाटील यांनी या उपक्रमाची सुरुवात केली होती. तसेच, मतदार संघातील कोरोनावर यशस्वीपणे मात केलेल्या कोरोना योद्ध्यांना प्लाझ्मादानासाठी आवाहन केले होते.

या उपक्रमाअंतर्गत प्लाझ्मादान करु इच्छिणाऱ्यांसाठी आ. चंद्रकांत पाटील यांनी आपल्या जनसंपर्क कार्यालयात अँटीबॉडी टेस्टची स्वतंत्र सुविधा उपलब्ध केली होती. त्याला मतदारासंघातील नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून, आता या उपक्रमात महिलाही सहभागी होत असल्याचे चित्र आहे. मतदारसंघातील अनेक महिलांनी अँटीबॉडी टेस्टसाठी पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधून अँटीबॉडी टेस्ट करुन घेत आहेत.

यामध्ये मतदार संघातील महिला सोनाली जाधव यांची गुरुवारी 24 सप्टेंबर रोजी प्लाझ्मादानासाठी अँटीबॉडी टेस्ट केली होती. यानंतर प्लाझ्मादानाच्या अनुषंगाने सोनाली यांच्या अहवाल सकारात्मक आल्याने, रविवारी त्यांनी प्लाझ्मादान केला. यावेळी त्यांच्यासोबत कोथरुडचे भाजपा अध्यक्ष पुनित जोशी, प्रभाग क्रमांक 12 च्या नगरसेविका हर्षाली माथवड, भारतीय जनता पक्षाचे कोथरुडचे सरचिटणीस दिनेश माथवड, विठ्ठल बराटे यांच्यासह भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

सोनाली यांच्या या पुढाकाराचे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी कौतुक केले असून, शहरात ज्या महिलांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे, त्यांनी पुढाकार घेऊन प्लाझ्मादान करावा. जेणेकरुन प्लाझ्मादानातून दोन रुग्णांना जीवदान मिळण्यास मदत होईल.

दरम्यान, प्लाझ्मादानाच्या उपक्रमाअंतर्गत आतापर्यंत 90 जणांची अँटीबॉडी टेस्ट करण्यात आली असून, त्यापैकी आजपर्यंत 40 दात्यांनी प्लाझ्मादान केला आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »