
दिवंगत पत्नीच्या स्मृतीप्रित्यर्थ इंडियन डर्बीला ‘विलू पूनावाला इंडियन डर्बी’ असे नामकरण; पुणे रेसकोर्सला नाव देण्यास होत असलेल्या विलंबाबद्दल व्यक्त केली तीव्र नाराजी.

पुणे : राजश्री अतकरे
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे (Serum Institute of India) अध्यक्ष, उद्योगपती डॉ. सायरस पूनावाला (Dr. Cyrus Poonawalla) यांनी घोडे शर्यतीच्या (Horse Racing) जगातील दोन प्रतिष्ठित स्पर्धांना प्रायोजकत्व देऊन मोठी घोषणा केली आहे. मात्र, या घोषणेसोबतच त्यांनी मुंबई आणि पुणे टर्फ क्लबच्या (Turf Club) कार्यपद्धतीवर आणि व्यवस्थापनावर थेट हल्ला चढवला आहे.

विलंबानंतर इंडियन डर्बीला मिळाला आधार
डॉ. पूनावाला यांनी जाहीर केले की, मागील वर्षी प्रायोजक नसलेल्या इंडियन डर्बीला आता त्यांचे प्रायोजकत्व लाभले आहे.


- भावनिक जोड: डॉ. पूनावाला यांनी स्पष्ट केले की, त्यांची दिवंगत पत्नी स्वर्गीय विलू पूनावाला यांना घोडे शर्यतीची प्रचंड आवड होती. त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी त्यांनी इंडियन डर्बीला प्रायोजकत्व दिले.
- नवीन नाव: इंडियन डर्बीला आता ‘विलू पूनावाला इंडियन डर्बी’ म्हणून ओळखले जाईल.
- पुणे डर्बी: इंडियन डर्बीपाठोपाठ, त्यांनी पुणे डर्बीचीही जबाबदारी घेतली आहे. मागील प्रायोजकाला टर्फ क्लबने ‘होल्ड’वर ठेवल्यामुळे पुणे डर्बीसाठी कोणीही स्पॉन्सर नव्हता. पूनावाला यांनी पुढील पाच वर्षांसाठी पुणे डर्बीला प्रायोजकत्व देण्याचा निर्णय घेतला आहे.
टर्फ क्लबवर ‘ॲलर्जी’ आणि ‘खोटे कारणां’चा थेट आरोप
प्रायोजकत्व जाहीर केल्यानंतर डॉ. पूनावाला यांनी टर्फ क्लबवर अनेक गंभीर आरोप केले. पुणे रेसकोर्सला विलू पूनावाला यांचे नाव देण्यास व्यवस्थापन जाणीवपूर्वक विलंब करत असल्याचा त्यांचा मुख्य आक्षेप आहे.
डॉ. पूनावाला यांचे प्रमुख आक्षेप:
- प्रोस्पेक्टसमध्ये दुर्लक्ष: “जो प्रायोजक ब्लॅकलिस्टेड झाला आहे, हे सर्वांना माहीत असतानाही, प्रॉस्पेक्टसमध्ये ‘डॉ. सायरस पूनावाला नेहमी तयार आहेत’, असा उल्लेख करायला हवा होता.” असे त्यांनी स्पष्ट केले.
- विलंब आणि टाळाटाळ: पुणे रेसकोर्सला विलू पूनावाला यांचे नाव देण्यास क्लब जाणीवपूर्वक टाळाटाळ करत आहे, याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
- खोटे कारणे: क्लबकडून प्रॉस्पेक्टस वेळेवर छापल्याचे जे कारण दिले जात आहे, ते त्यांनी साफ फेटाळले. “हे क्लब फक्त खोटे कारणे (Lame Excuses) देत आहेत,” अशी टीका त्यांनी केली.
- सडेतोड टीका: त्यांनी थेट शब्दांत क्लबवर टीका करताना म्हटले, “मला वाटते त्यांना खरंच आमची ॲलर्जी झाली आहे!“
PM मोदींकडे धाव

क्लबकडून प्रतिसाद मिळत नसल्याने आणि मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याने, डॉ. पूनावाला यांनी आता थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत या विषयावर संपर्क साधला असल्याचे सांगितले. “मी पुन्हा एकदा पंतप्रधानांसोबत ही चळवळ सुरू केली आहे,” असे ते म्हणाले. कोविड काळात पूनावाला साहेबांनी केलेल्या कामाचाही त्यांनी यावेळी उल्लेख केला.
एकंदरीत, घोडे शर्यतीच्या या प्रतिष्ठित स्पर्धांना मोठा आर्थिक आणि भावनिक आधार मिळाला असला तरी, टर्फ क्लब आणि पूनावाला कुटुंबातील हा संघर्ष आता मोठ्या स्तरावर पोहोचला आहे.