
नागपूर : हिमालयीन सतगुरू श्री शिवकृपानंद स्वामीजी ध्यानस्थळ नागपुर येथे पुनरआगमन करण्यास सज्ज असून, २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ध्यानस्थली, मध्यभारत समर्पण आश्रम, ठाणा (पादरी), बुटीबोरी-उमरेड रोड, नागपूर मध्ये होणा-या या आध्यात्मिक सत्संगात साधकांना आपली आध्यात्मिक उन्नती साधण्याची एक सोनेरी संधी या ठिकाणी असणार आहे. सतगुरू ची दिव्य उपस्थिति आणि त्यासोबतच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत, ज्यामुळे हा सोहळा आणि विशेष होणार आहे.
सतगुरू श्री शिवकृपानंद स्वामीजी म्हणजे आध्यात्मिक ज्ञानाचे भांडार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त साधकांनी या सोहळ्याला उपस्थित राहून ज्ञानार्जन करीत आत्मिक आनंदाची अनुभूती घ्यावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे नागपूर शहर हे सतगुरू ची जन्मभूमी आणि गुजरात ही त्यांची कर्मभूमी आहे. सतगुरू आता नागपूरला येऊन पुढील अनेक वर्षांसाठी ऊर्जेचे एक केंद्र स्थापित करणार आहेत. येथे येऊन सर्व साधक या दिव्या ऊर्जा केंद्राच्या सान्निध्यात येणार आहेत.


मंगलमूर्तीची प्रतिष्ठापना : नागपूरकर नागरिकांसाठी सोनेरी संधी
महानवरात्री अनुष्ठानाच्या शुभारंभासह ध्यानस्थळ नागपूर, मध्यभारत समर्पण आश्रम, बुटीबोरीमध्ये हा अनोखा आध्यात्मिक समारोह होणार आहे. हिमालयीन सतगुरू श्री शिवकृपानंद स्वामीजी आपल्या ऊर्जेद्वारे प्राणप्रतिष्ठा करणार आहेत. ही संधी नागपूरकरांसाठी जीवनात फारच दूर्मिळ असणार आहेत. या सुवर्णक्षणांचे साक्षीदार होण्यासाठी नागपूरकरांनी या सोहळ्याला उपस्थिती लावणे गरजेचे आहे. या सोहळ्यात सतगुरू च्या ऊर्जेत स्नान करण्याचा योग साधकांना उपलब्ध होणार आहे.
सतगुरू च्या सोबत गुरू परंपरेची उपस्थिती: साधकांसाठी हितकारी
महानवरात्री अनुष्ठानादरम्यान सदगुरू आपल्या स्थूल रुपात येतात आणि जेंव्हा ते या रुपात येतात, तेंव्हा त्यांचे सगळे गुरूदेखील सूक्ष्मरुपात येथे उपलब्ध असतात. त्यामुळे साधकांना गुरू परंपरेचा एक अदृश्य आणि शक्तिशाली ऊर्जेचा अनुभव येथे येणार आहे. ही ऊर्जामय लहर साधकांचे पूर्ण अंतर्मन सकारात्मक प्रकाशाने व्यापून टाकणार आहे, ज्यामुळे साधक आपले मन स्थिर करू शकतात व नवीन आध्यात्मिक ऊंची गाठू शकतात.
मंगलमूर्ती प्रतिष्ठापना पूर्णाहुती समारोह : आध्यात्मिक प्रगतीसाठी सर्वोच्च प्रार्थनेची संधी
महानवरात्री अनुष्ठानचा परमोच्च क्षण २ ऑक्टोबर २०२५ ला होणारा पूर्णाहूती समोरह आहे. ध्यानस्थळ नागपूर, मध्यभारत समर्पण आश्रम, बुटीबोरी येथे हजारो साधक या दिव्य कार्यासाठी एकत्रित येणार आहेत.
या ऐतिहासिक समारोहात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार आहेत. यानिमित्ताने या सोहळ्याचे महत्व अनेक पटींनी वाढणार आहे. साधारणपणे सतगुरू च्या उपस्थितीत साधक अनेक वेळा भौतिक इच्छापूर्तीची कामना करतात. परंतु सतगुरू च्या संदेशानुसार जर आपण सर्वोच्च प्रार्थना केली तर आपली आध्यात्मिक प्रगती होते आणि त्यातून जीवनातील सगळ्या गरजा आपोआप पूर्ण होतात. त्यासाठी या सोहळ्यातून दिव्य अनुभूती घेणे गरजेचे आहे.