
राजश्री आतकरे ( rajshri.atkare@gmail.com)
सांगवी : सांगवी पोलिस ठाण्याच्या वतीने नवरात्रोत्सव शांततेत व डीजेमुक्त वातावरणात साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले.
अय्यम्मा हॉल, कृष्णा चौक येथे झालेल्या बैठकीत वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र कोळी व गुन्हे शाखेचे निरीक्षक अमोल नांदके यांनी मंडळ पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांना मार्गदर्शन केले.


👉 नवरात्र, दशहरा, कोजागिरी हे उत्सव परंपरागत वाद्यांच्या गजरात साजरे करावेत.
👉 विसर्जनावेळी डीजे, लेझर लाईटचा वापर टाळावा.
👉 धार्मिक भावना दुखावतील असे वर्तन करू नये.
👉 दांडिया-गरब्यात डीजे वाजवू नये.
👉 न्यायालयाने ठरवलेल्या डेसिबलपेक्षा आवाज जास्त ठेवू नये.
👮 पोलिसांनी स्पष्ट संदेश दिला – “कायद्याचे पालन करा, उत्सव आनंदात व सुरक्षिततेत साजरा करा.”