पिंपरी चिंचवड : (राजश्री अतकरे) पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रभाग रचनेवर माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी गंभीर हरकत नोंदवली आहे. मूळ प्रभाग क्रमांक 29 मधील साईराज रेसिडेन्सी, सह्याद्री कॉलनी, श्रीनगर, बासिलिओ, शिवदत्तनगर, शिवरामनगर हा परिसर भौगोलिकदृष्ट्या मौजे पिंपळे गुरव हद्दीत मोडतो. मात्र, या परिसराला नव्या रचनेत प्रभाग क्रमांक 32 मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे हा भाग पूर्ववत करून प्रभाग क्रमांक 29 किंवा 31 मध्ये समाविष्ट करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
लोकसंख्या संतुलनाचा मुद्दा
जगताप यांनी महापालिका निवडणूक विभागाला दिलेल्या हरकतीत लोकसंख्येचे आकडेवारीसह विवेचन केले आहे.
प्रभाग 29 ची लोकसंख्या : 49,146
प्रभाग 31 ची लोकसंख्या : 51,849
प्रभाग 32 ची लोकसंख्या : 54,614
यावरून प्रभाग 32 मध्ये लोकसंख्या जास्त होत असून, वादग्रस्त परिसर प्रभाग 29 किंवा 31 मध्ये समाविष्ट केल्यास तिन्ही प्रभागांतील लोकसंख्या संतुलित राहील, असे जगताप यांनी नमूद केले आहे.
नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या
या भागातील नागरिकांना कचरा उचलणाऱ्या गाड्या, स्ट्रिट लाईट, गतिरोधक बसविणे, चेंबर साफसफाई, पदपथ व ब्लॉक बसविणे अशा मुलभूत कामांमध्ये प्रचंड विलंब होत असल्याचे जगताप यांनी सांगितले. त्यामुळे नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने प्रभाग रचनेत सुधारणा करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नवीन प्रभाग रचना (महत्त्वाचे भाग)
प्रभाग 29 : कल्पतरु इस्टेट, क्रांतीनगर, काशिद पार्क, गगनगिरी पार्क, जवळकरनगर, शिवनेरी कॉलनी, गुलमोहर कॉलनी, ओंकार कॉलनी, श्रीकृष्णनगर, गोकुळनगरी, भालेकरनगर, पिंपळे गुरव, सुदर्शन नगर, वैदुवस्ती आदी.
प्रभाग 31 : राजीव गांधीनगर, गजानन महाराज नगर, कीर्ती नगर, विनायकनगर, गणेशनगर, कवडेनगर, मयूरनगरी, रामनगर, गजानन पार्क, विद्यानगर, ज्ञानेश पार्क, समतानगर, राजारामनगर, संत तुकाराम नगर, आनंद पार्क, ऊरो रुग्णालय परिसर.
प्रभाग 32 : सांगवी गावठाण, कुंभारवाडा, गंगानगर, आनंदनगर, मधुबन सोसायटी, ढोरेनगर, पवारनगर, शिंदेनगर, मुळानगर, लक्ष्मीनगर, चंद्रमणी नगर, जयमालानगर, उष:काल सोसायटी, पवनानगर, संगमनगर, प्रियदर्शनीनगर, एस.टी कॉलनी, ममतानगर, पुष्पापार्क, कृष्णानगर तसेच वादग्रस्त साईराज रेसिडेन्सी, सह्याद्री कॉलनी, श्रीनगर, बासिलिओ, शिवदत्तनगर, शिवरामनगर.
👉 या पार्श्वभूमीवर, प्रभाग रचनेबाबतचा वाद आगामी महापालिका निवडणुकीत राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Please follow and like us:
Pin Share

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »