
पुणे : पुण्याच्या प्रीमियम रिअल इस्टेट क्षेत्रातील एक विश्वासार्ह नाव असलेल्या शुभ डेव्हलपर्सने आपल्या नवीन अल्ट्रा-लक्झरी निवासी प्रकल्प ‘शुभ वेदा’ चा अधिकृत लाँच नुकताच केला. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (PCMC) क्षेत्रात १३.५ एकर विस्तीर्ण भूखंडावर उभारला जाणारा हा प्रकल्प निसर्ग, आधुनिक वास्तुकला आणि प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानाचा अद्वितीय संगम साधणार आहे.
प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोरा यांची या प्रोजेक्ट आणि ब्रँडसाठी ब्रँड फेस म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्या संलग्नतेमुळे या प्रकल्पाच्या लक्झरी आणि प्रतिष्ठेला नवसंजीवनी मिळाली आहे.
‘शुभ वेदा’ची वैशिष्ट्ये:


८ भव्य टॉवर्समध्ये ३, ४ आणि ४.५ BHK अल्ट्रा-लक्झरी निवास
७०% ओपन स्पेससह ६.८ एकरमध्ये भव्य सुविधा क्षेत्र
ऋग, यजुर, साम व अथर्व वेदांपासून प्रेरित लँडस्केप डिझाइन
योगा डेक्स, मेडिटेशन गार्डन, वेलनेस सेंटर्स, मिनी थिएटर, स्टेप्ड टेरेसेस, पूल, चिल्ड्रन्स झोन आदी सुविधांचा समावेश
प्रकल्पाच्या लाँचबाबत श्री. राजेश मित्तल (पार्टनर व डायरेक्टर, शुभ डेव्हलपर्स) म्हणाले, “‘शुभ वेदा’ हा केवळ एक निवासी प्रकल्प नाही, तर तो आधुनिक जीवनशैलीत प्राचीन भारतीय शहाणपणाचा अनुभव देणारा एक सांस्कृतिक निवास आहे. प्रत्येक कोपरा, प्रत्येक डिझाइन, रहिवाशांना शांती, अभिमान आणि उद्देश देण्यासाठी तयार केला आहे.”
श्री. विशाल सुमेरचंद अग्रवाल यांनी सांगितले की, “आजच्या शहरी कुटुंबांना शांती आणि सोयी दोन्ही हव्या असतात. ‘शुभ वेदा’ हेच संतुलन साधतो. निसर्ग, संस्कृती आणि आधुनिक सुविधा यांचा आदर्श संगम या प्रकल्पात साधण्यात आला आहे.”
श्री. रमेश अग्रवाल यांनी नमूद केले की, “PCMC हे झपाट्याने विकसित होणारे क्षेत्र आहे आणि ‘शुभ वेदा’ हा इथे उभा राहणारा एक नवा लँडमार्क ठरेल.”
डिझाईनची जबाबदारी क्लिंट डेन्वर पॉन्सिका (साईट कॉन्सेप्ट्स प्रा. लि.) यांनी पार पाडली असून, पारंपरिक भारतीय तत्त्वज्ञानावर आधारित डिझाइनला आधुनिकतेची जोड देण्यात आली आहे. बॉल्कनींचं विशिष्ट पोझिशनिंग, ड्रिप इरिगेशन प्लांटर्स, वेदाधारित गार्डन अशा वैशिष्ट्यांनी प्रकल्पाच्या डिझाइनमध्ये सूक्ष्म विचार दिसून येतो.
शुभ डेव्हलपर्स बद्दल:
२०११ मध्ये स्थापन झालेल्या शुभ डेव्हलपर्सने अचूकता, गुणवत्ता आणि ग्राहक समाधान यांवर भर देत पुण्यात एक विश्वासार्ह स्थान निर्माण केलं आहे. त्यांनी रिअल इस्टेट केवळ बांधकाम नव्हे तर सामाजिक-आर्थिक विकासाचं एक माध्यम मानलं आहे.
२०३० पर्यंत १०,००० समाधानी कुटुंबांपर्यंत पोहोचण्याच्या ध्येयाने प्रेरित, शुभ डेव्हलपर्स पुण्यातील शहरी जीवनशैलीला नव्या उंचीवर नेण्यासाठी कटिबद्ध आहे.
अधिक माहितीसाठी भेट द्या: https://shubhdevelopers.com