पिंपरी : पावसाळा सुरू होताच डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यांसारख्या डासजन्य आजारांचा धोका लक्षणीय प्रमाणात वाढतो. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य तसेच वैद्यकीय विभागामार्फत प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. तसेच डेंग्यूबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यास देखील भर दिला जात आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने पावसाळ्यात डासजन्य आजारांचा धोका कमी करण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या उपाययोजनांमध्ये नागरिकांनी देखील सक्रियपणे सहभागी व्हावे. तसेच आपला परिसर स्वच्छ ठेवा आणि आठवड्यातून एक दिवस हा ‘कोरडा दिवस’ पाळा, असे आवाहन देखील महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

डेंग्यू आजाराबाबत

  • डेंग्यू हा विषाणुमुळे होणारा आजार आहे.
  • डेंग्यूचा विषाणू एडिस इजिप्ती डासाच्या चाव्याद्वारे माणसाच्या शरिरात प्रवेश करतो.
  • हा आजार पसरवणारा डास दिवसा चावतो.
    ………
    लक्षणे
  • ताप येणे, डोके दुखणे, डोळे दुखणे, सांधे दुखणे, मासपेशी दुखणे
  • ताप तसेच अंगावर लालसर पूरळ येतात
  • उलट्या होणे, पोट दुखणे, थुंकी, उलटी, लघवीतून रक्त पडणे
    ……..

येथे होते डासांची उत्पत्ती

एडिस इजिप्ती हा डास साचलेल्या स्वच्छ पाण्यात अंडी घालतो, व त्यातून डासांची उत्पत्ती होते. कुलर, फ्रिज, कुंड्या, फुलदाणी, प्लास्टीकच्या टाकाऊ वस्तू, नारळाच्या करवंट्या, काचेच्या फुटक्या बाटल्या आदी भंगार साहित्यात पाणी साचले तर त्यामध्ये या डासांची उत्पत्ती होते. उघड्या पाण्याच्या टाक्या, जुने टायर, उघडे हौद, उघडे सेफ्टीक टँक, रस्त्यावर खड्ड्यात साचलेले पावसाचे पाणी, सांडपाणी येथेही या डासांची उत्पत्ती होते.
…….
हे लक्षात ठेवा

  • पाण्याच्या टाक्या, हौद, पाणी साठे झाकून ठेवावे.
  • कुलर, फ्रिज, फुलदाणी आदीमधील पाणी दर दोन-तीन दिवसांनी बदलावे.
  • जुने टायर, नारळाच्या करवंट्या, टाकाऊ वस्तू नष्ट कराव्यात.
  • सेप्टीक टँकच्या व्हेंट पाइपला जाळी बसवावी.
  • पाणी साठवण हौद, भांडी घासून पुसून स्वच्छ व कोरडी ठेवावीत.
  • आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा.
  • डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेऊ नका.
  • डेंग्यू आजारबाधीत भागात रुग्णांना भेटी देऊ नका.
  • घर व परिसरात पावसाचे पाणी, सांडपाणी साचू देऊ नका.
  • घरातील पाणीसाठे उघडे ठेवू नका.
  • टाकाऊ वस्तू, फुटक्या बाटल्या, नारळाच्या करवंट्या, जुने टायर्स, फुटकी भांडी, निरुपयोगी वस्तू उघड्यावर फेकू नका.
  • प्रत्येक प्रभागात आरोग्य निरीक्षकांमार्फत घरांचे सर्वेक्षण
  • डासांचे अळीसाठी नियमित अळीनाशक फवारणी
  • बाधित भागांमध्ये धूर फवारणी
  • डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी आठवड्यातील प्रत्येक शुक्रवार हा ‘कोरडा दिवस’ म्हणून घोषित
  • महापालिकेच्या वैद्यकीय विभागातील आरोग्य केंद्रांमध्ये मोफत तपासणी व औषधोपचार

महापालिकेकडून करण्यात येत आहेत उपाययोजना

…..

कोट:

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत प्रतिबंधात्मक उपाय योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू असून, डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांनी घाबरून न जाता सहकार्य करावे. डेंग्यूवर वेळीच उपचार केल्यास रुग्ण पूर्णपणे बरा होतो त्यामुळे नागरिकांनी देखील डेंग्यू मलेरियाच्या नायनाटासाठी महापालिकेस सर्वतोपरी सहकार्य करावे

— विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

……

कोट
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून डेंग्यू मलेरिया बाबत आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या असून, नागरिकांनी डेंग्यू मलेरियाबाबत काही प्राथमिक लक्षणे दिसल्यास त्वरित नजीकच्या महानगरपालिका रुग्णालयात उपचारासाठी संपर्क साधावा.

–डॉ. लक्ष्मण गोफणे
आरोग्य वैद्यकीय अधिकारी
पिंपरी चिंचवड महापालिका
…….
कोट

डेंग्यू व मलेरियाच्या डासांची उत्पत्ती टाळण्यासाठी नागरिकांनी स्वतःच्या घराबरोबरच आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा. घरगुती कुलर, टायर, कुंड्यांची दर आठवड्याला स्वच्छता करावी तसेच आठवड्यातील कोरडा दिवस न चुकता पाळावा. डेंग्यू मलेरियाचे निर्मूलन करण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात असून, नागरिकांनी देखील महापालिकेस सहकार्य करावे

— सचिन पवार, उपायुक्त
आरोग्य विभाग, पिंपरी चिंचवड महापालिका

Please follow and like us:
Pin Share

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »