
पिंपरी चिंचवड (दिघी):
एका साधारण दिसणाऱ्या ओढणीमुळे संपूर्ण दिघी हादरली… आणि एका बेपत्ता तरुणीच्या प्रकरणाला एक वेगळेच वळण मिळाले. वैष्णवी इंगवले या १८ वर्षीय तरुणीचा मृतदेह अखेर ४५ फूट खोल विहिरीत सापडला.
सुरुवात झाली एका तक्रारीपासून…
वैष्णवी बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या वडिलांनी दिघी पोलीस ठाण्यात दिली होती. मुलगी कुठे गेली? तिचा काही पत्ता लागत नव्हता. सर्वत्र शोध सुरू होता. आणि अचानक एक छोटीशी गोष्ट पोलिसांच्या नजरेत आली – विहिरीच्या काठावर पडलेली एक ओढणी!


संशय… शोध… आणि भीती
त्या ओढणीने पोलिसांचा संशय बळावला. त्यांनी निर्णय घेतला – विहिरीत अंडरवॉटर कॅमेरा सोडण्याचा!
४५ फूट खोल… काळोख्या पाण्यात… आणि कॅमेऱ्यात उमटलेली ती दृश्यं… सगळ्यांची श्वास रोखून धरायला लावणारी!
कॅमेऱ्यात दिसलं भयावह सत्य
तळाशी दिसला वैष्णवीचा मृतदेह. काळजाचा ठोका चुकवणारी ती प्रतिमा पाहून सर्वांची अवस्था कठीण झाली. मृतदेह विहिरीतून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला.
हत्या की आत्महत्या? तपास सुरूच…
सध्या ही हत्या आहे की आत्महत्या याचा तपास दिघी पोलिसांकडून सुरू आहे. मृत्यूच्या खऱ्या कारणाचा शोध घेण्यासाठी पोलिसांची टीम विविध अंगाने तपास करत आहे.
परिसरात चर्चेचा विषय
ही घटना समोर येताच दिघी परिसरात प्रचंड खळबळ माजली आहे. स्थानिक रहिवासी चिंतेत आहेत. वैष्णवीच्या मृत्यूमागील सत्य काय? हे लवकरच समोर येईल अशी अपेक्षा आहे.