
रस्त्यावर गाड्या फोडल्या… पेटवल्या… आणि वर व्हिडिओ करून सोशल मीडियावर पोस्ट!
चिंचवड : “गुन्हेगारांना पोलिसांची भीती उरलीय का?” हा सवाल सध्या चिंचवडमध्ये प्रत्येकाच्या तोंडी आहे. कारण, रविवारी मध्यरात्री वाल्हेकरवाडीत जे घडलं… ते थरकाप उडवणारं होतं!
टोळक्याचा धिंगाणा LIVE ऑन कॅमेरा!



रात्रीच्या सन्नाट्यात अचानक गुन्हेगारांचं टोळकं तुफानी आरडाओरड करत रस्त्यावर धडकलं.
काचांची कर्रर्र आवाज… दुचाकी ढकलून फेकल्या… टेम्पो आणि चारचाकी वाहनांची अक्षरशः धज्ज्या…
आणि या सगळ्या थरकापजनक क्षणांना मोबाईल कॅमेऱ्याने ‘LIVE RECORD’ करत होते हे गावगुंड!
तोडफोड… आगजनी… आणि त्याचा व्हिडिओ थेट सोशल मीडियावर!
“आता बघा… आमची ताकद!” असा जणू संदेशच त्यांनी दिला.
पोलिसांची ‘NON ACTIVE’ भूमिका पुन्हा एकदा चव्हाट्यावर!
या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचं वातावरण.
“पोलिस आहेत तरी कुठे?”, “गुन्हेगार मोकाट… पोलिस झोपलेत का?”, अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून सोशल मीडियावर सुरु झाल्या.
सर्वात धक्कादायक गोष्ट?
घटना घडून कित्येक मिनिटं उलटून गेल्यावरही चिंचवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहचलेच नाहीत!
पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे मात्र घटनास्थळी तत्परतेने दाखल झाल्या, ही बाब नागरिकांच्या चर्चेचा विषय ठरली.
गुन्हेगार ‘बिनधास्त’… पोलीस ‘बेफिकीर’…
मागील काही महिन्यांपासून चिंचवड पोलिसांची कारवाई शून्य असल्याच्या तक्रारी होत्याच.
गस्त कमी, माहिती असूनही कारवाई नाही, गुन्हेगारांना मोकळं रान…
आता या प्रकाराने लोकांचा संयम सुटला आहे.
सध्या परिस्थिती काय?
गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने काही संशयितांना ताब्यात घेतलंय.
सीसीटीव्ही फुटेजची काटेकोर तपासणी सुरू आहे.
पण नागरिकांची एकच मागणी – “फक्त चौकशी नको… आता थेट कडक कारवाई हवी!”
नागरिकांचा इशारा :
“यापुढे जर सुरक्षा मिळाली नाही… तर रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय नाही!”