२५ जूनला पिंपरी चिंचवडमध्ये मनसेच्या वतीने भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन

पिंपरी चिंचवड :– मराठी हृदय सम्राट मा. राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना, रोजगार व स्वयंरोजगार विभाग, पुणे शहर यांच्या वतीने दिनांक २५ जून २०२५ रोजी “अंकुशराव लांडगे सभागृह, भोसरी, पिंपरी चिंचवड” येथे “भव्य रोजगार व रोजगाराभिमुख प्रशिक्षण मेळाव्याचे” आयोजन करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष रोजगार व स्वयंरोजगार विभाग महाराष्ट्र राज्य महेंद्र बैसाणे यांनी दिली. रागा हॉटेल पिंपरी येथे आज (दि.२३) झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी सरचिटणीस सिद्धी आंगणे, महेश महाले,मनसे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष श्री. सचिन चिखले व इतर मनसेचे विविध नेते, पदाधिकारी व आयोजक आदी उपस्थित होते.

यावेळी बैसाणे म्हणाले की,मेळावा सकाळी ९:३० ते संध्याकाळी ५:०० या वेळेत पार पडणार असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते व विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष मा. अमितसाहेब ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.मेळाव्यास मनसे नेते अनिल शिदोरे, बाबू वागस्कर, अॅड. गणेश सातपुते, अॅड. किशोर शिंदे, बाळा शेडगे, हेमंत संभूस, रणजीत शिरोळे, अजय शिंदे, प्रवक्ते योगेश खैरे, तसेच पुणे शहराध्यक्ष साईनाथ बायर आणि पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सचिन चिखले यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.या रोजगार मेळाव्यासाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाचे विशेष सहकार्य लाभले असून, पुणे व पिंपरी चिंचवड येथील नामांकित औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे प्राचार्य देखील उपस्थित राहणार आहेत.

या मेळाव्यात ५० नामवंत कंपन्या सहभागी होणार असून २००० हून अधिक नोकरीच्या संधी उपलब्ध असतील. सहभागी कंपन्यांमध्ये Samsonite, Volkswagen, Spark Minda, Mahindra, Tata Group, ITC, यशस्वी ग्रुप, युवा शक्ति, डेक्कन एज्युकेशन, सायबर सक्सेस यांचा समावेश आहे.कार्यक्रम पूर्णपणे मोफत असून कोणतीही फी आकारली जाणार नाही. इच्छुक उमेदवारांनी क्यूआर कोड स्कॅन करून किंवा लिंकच्या माध्यमातून आपला बायोडाटा अपलोड करून नोंदणी करावी, असे आवाहन राज्य उपाध्यक्ष महेश महाले यांनी पत्रकार परिषदेत केले.

मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रोजगार मेळाव्याचे स्वागत करून या माध्यमातून साहेबांचे स्वप्न साकार होईल अशा भावना व्यक्त केल्या.

राज्य अध्यक्ष महेंद्रजी बेसाणे यांनी सर्व बेरोजगार तरुण-तरुणींनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन सरचिटणीस सिद्धीताई आंगणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे सर्व पदाधिकारी, तसेच पिंपरी चिंचवड शहर मनसेच्या कार्यकर्त्यांचे सहकार्य या उपक्रमासाठी लाभत असल्याची माहिती बेसाणे यांनी दिली.

Please follow and like us:
Pin Share

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »