





पुणे : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास केवळ 68 शब्दांमध्ये मांडला जाऊ शकतो का? असा सवाल देखील अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने पुणे येथील पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित केला गेला.
CBSC च्या केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये इयत्ता चौथी ते बारावी पर्यंतच्या अभ्यासक्रमामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या वर फक्त एक धडा आणि तोही 68 शब्दांचा खरंच छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्याबद्दलचे काम फक्त 68 शब्दांमध्ये मांडणे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज सोबतच महाराष्ट्राचा अपमान करण्याचं काम केल आहे. हे पुस्तक देशपातळीवर शिकवल्या जाणार आहे. यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने या पुस्तकाचा संदर्भात अखिल भारतीय मराठा महासंघाने निषेध व्यक्त केला आहे. 68 शब्दात महाराष्ट्राचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मांडणे म्हणजे चक्क दिल्ली सीबीएससी पॅटर्न महाराष्ट्राचा अपमान केला आहे तसेच येणाऱ्या काळामध्ये हे सीबीएससी पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रात राज्य सरकार लागू करणार आहे. यासाठी मराठ्यांचा इतिहास मेरा पिढीला समजणे आवश्यक आहे यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघ या गोष्टीचा निषेध करून येणाऱ्या काळामध्ये या संदर्भात ठोस पावले उचलणार आहेत असा इशारा पत्रकार परिषदेत अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने पुणे येथे देण्यात आला.