एकही नारा…एकही नाम… जय श्रीराम: पिंपरी-चिंचवडमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील अतिभव्य शोभायात्रा!

  • आमदार महेश लांडगे यांच्या सोबतीने रामभक्तांचा जल्लोष
  • ‘हिंदू एकजूट’चा संकल्प करीत युवकांचा लक्षणीय पुढाकार

पिंपरी-चिंचवड : ‘‘एकही नारा…एकही नाम… जय श्रीराम…’’ असा जयघोष करीत पिंपरी-चिंचवडमध्ये राम नवमी उत्साहात साजरी करण्यात आली. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी शोभायात्रा भोसरी आणि परिसरातून काढण्यात आली. यामध्ये विविध मंडळांनी एकजुट दाखवत जन्मोत्सव दणक्यात साजरा केला.

इंद्रायणीनगर येथे विश्व हिंदू परिषद, बजरंग दल अशा संघटनांनी भव्य शोभायात्रा काढली. भोसरीतील कृपासाई फाउंडेशनचे संस्थापक प्रदीप पवार यांच्या पुढाकाराने रामरथ सोहळा आयोजित करण्यात आला. यामध्ये महबली हनुमान मूर्ती शोभायात्रेचे आकर्षण ठरले.

तसेच, सुमीत लांडगे युथ फाउंडेशन, जय भवानी युवा मंच, श्री. दुर्गामाता सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ, मोशी येथील शिवयोद्धा ग्रुप, एसवाय ग्रुप सोशल फाउंडेशन, राम नवमी उत्सव समिती, निगडी यांच्या तर्फे प्रभू श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. या सर्व मंडळांचे आधारस्तंभ म्हणून आमदार महेश लांडगे यांच्या नावाचा उल्लेख केला जात आहे.

आमदार लांडगे म्हणाले की, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामांच्या आदर्शमय जीवनातून प्रेरणा घेऊन समाजात सौहार्द, सहिष्णुता आणि सत्याची मूल्ये अधिक बळकट झाली पाहिजेत. श्रीरामांनी दाखवलेली प्रजाहितदक्षता, सत्यनिष्ठा आणि निःस्वार्थ सेवा ही आजही आपल्यासाठी प्रेरणादायी ठरतात. त्यांच्या जीवनातून आपण एकता, शांती आणि समरसतेची शिकवण घेणे आवश्यक आहे.


प्रतिक्रिया :
‘हिंदू’ म्हणून युवकांनी एकोप्याने राहिले पाहिजे. समाजातील आठरापगड जाती-बारा बलुतेदार यांना सोबत घेवून जाणारे हिंदूत्व आपल्या प्रभू श्रीरामांनी शिकवले. त्यांच्या विचारांनीच छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज निर्माण केले. छोट्या-छोट्या मंडळांमध्ये श्रीराम जन्मोत्सव न करता भव्य-दिव्यपणे प्रत्येक परिसरात व्हावा. तमाम हिंदूत्त्ववादी युवकांनी यावर्षी उत्सव दिमाखात साजरा केला, ही परंपरा कायम रहावी, अशीच प्रार्थना आहे.

  • महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »