
पुणे : आंतरराष्ट्रीय स्तरावर अतिशय प्रतिष्ठित समजली जाणारी रोटरी क्लब संघटनेच्या वतीने दिला जाणारा इंटरनॅशनल पिस अवॉर्ड यावर्षी साधू वासवानी मिशनच्या प्रमुख दिदी क्रिष्णा कुमारी यांना देण्यात आला आहे.

अध्यात्म आणि परमात्मा यांची योग्य सांगड घालून त्याचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून प्रचार व प्रसार करून, समाजात एकोपा आणि शांतता निर्माण केल्याचं उल्लेखनीय कार्य केल्यामुळे, रोटरी क्लब ऑफ निगडी पुणे च्या वतीने दिला जाणारा इंटरनॅशनल पीस अवॉर्ड यावर्षी

दिदी क्रिष्णा कुमारी यांना देऊन सन्मानित करण्यात आलं. चिंचवड येथील एल प्रो मॉल च्या सभागृहात पार पडलेल्या अतिशय दिमाखदार सोहळ्यातदिदी क्रिष्णा कुमारी यांना इंटरनॅशनल पिस अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आलं. रोटरी क्लब ऑफ निगडीचे अध्यक्ष सुहास डामले आणि सचिव डॉक्टर राजेंद्र कदम तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते दिदी क्रिष्णा कुमारी यांना इंटरनॅशनल पिस अवॉर्ड देऊन सर्वांनी करण्यात आलं. आपल्या समाजात एकोपा आणि शांतता निर्माण करण्याचे कार्य हे आम्ही स्वतःच्या शक्ती तुन करत नसून, हे सर्व कार्य करण्याची शक्ती आम्हाला स्वतः परमेश्वराच्या कृपेने मिळते…..! अशी प्रतिक्रिया दिदी क्रिष्णा कुमारी यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे.

