संत तुकाराम नगर येथील बॅडमिंटन हॉलमध्ये आर्यन्स मार्शल आर्ट्सचा 17 वा वर्धापनदिन अतिशय उत्साहाने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात शिवभक्त अनिकेत भाऊ घुले यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे आणि मान्यवर म्हणून खालील व्यक्ती उपस्थित होते:
संत तुकाराम नगर पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक कुंभार साहेब
माजी नगरसेवक बबनराव गाडवे साहेब
माजी क्रीडा सभापती जितेंद्र भाऊ ननावरे
उद्योजक प्रकाश दादा रंधे
मुख्याध्यापक संतोष नेटके सर मुख्याध्यापिका मृदुला महाजन मॅडम तुकाराम महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष नंदू आप्पा कदम लहुजी सेनेचे राजू भाऊ आवले शिवसेनेचे भोलाराम पाटील गणेश रोकडे
मोहनशेठ वाडेलाल राजभाऊ काची राष्ट्रवादी काँग्रेसचे रवी भाऊ ओव्हाळ संपतराव पाचुंदकर चंदूभाऊ हलगे
बौद्ध विहाराचे सुनील इंगवले साहेब उद्योजक संतोष नाना काटे सिन्हा साहेब मातोश्री प्रतिष्ठानचे हेमंतजी मोरे दत्त मंदिराचे अध्यक्ष बारगळ काका
सामाजिक कार्यकर्ते गणेश काका शिर्के युवा नेते रोहन समुद्रे किरणशेठ काटे अतुलशेठ आल्हाट सुहासभाऊ साळुंखे मैत्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुलदादा नाईक निवासभाऊ भोसले शेखर पाटील युवा सेनेचे गौतम लहाने प्रविण गोडबोले जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा सुलभाताई यादव
सेवाभावी सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा मनीषाताई बोरकर धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठानच्या महिला प्रमुख नीलम संतोष म्हात्रे सामाजिक कार्यकर्त्या लक्ष्मीताई काची, पल्लवीताई लहाने, जयश्रीताई आडसूळ, विजयाताई रेवाळे
ब्लॅक बेल्ट पुरस्कार विजेते:
प्रिया मलगे, सार्थक तरडे, अक्षदा निमसे, साक्षी बनसोडे, दुवांश काटे, गायत्री ओव्हाळ, शुबदा लोखंडे, प्रथमेश कलकुटे, रजनी भुल, अजिंक्य आडसूळ, आदित्य मोरे, ज्योती सिंह. यांना ब्लॅक बेल्ट, सर्टिफिकेट, ड्रेस व ट्रॉफी देवून गौरविण्यात आले

कार्यक्रमातील वैशिष्ट्यपूर्ण सादरीकरणे:
पिंपळे सौदागर बॅचचे प्रशिक्षक परवेज शेख सर यांनी कौल फोडत सर्वांचे लक्ष वेधले.



संत तुकाराम नगर बॅचच्या विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीवर ऑक्ट सादर करून उपस्थित पालकांना जागरूक केले.
मोशी बॅचचे पिरॅमिड्स अत्यंत कौतुकास्पद ठरले.
विशेष सन्मान व सत्कार:

महिला बचत गटांचा सन्मान करण्यात आला.
गणेश मंडळांचा सत्कार करून त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले.
किल्ले स्पर्धा विजेत्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन:

कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन प्रदीप मस्के व सागर कोळी यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संतोष म्हात्रे सर यांनी सर्व पाहुण्यांचे आणि उपस्थितांचे आभार मानले.
कार्यक्रमाला मान्यवर, विद्यार्थी, पालक, आणि सामाजिक कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. आर्यन्स मार्शल आर्ट्सचा 17 वा वर्धापन दिन जल्लोषात यशस्वी झाला.